ylliX - Online Advertising Network

निरुपम विरोधात जोडे मारो आंदोलन , मनसे महिला आघाडीने पाठवल्या बांगड्या

मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सोबत भेट घेत होते आणि नाशिकला मनसे महिला आघाडी तर्फे संजय निरुपम यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी निरुपम यांच्या विरोधात जोरदार अशी घोषणाबाजी देखील झाली आहे. तर मनसे महिला आघाडीने निरुपम यांना बांगड्या मुंबईला पाठवल्या आहेत.

कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांच्या मनसे तसेच राज ठाकरे यांच्याविषयीच्या जे मुलाखतीती वाक्य वापरली त्याचा राग व्यक्त करत आज आंदोलन केले गेले आहे.

आज नवीन सीबीएस येथील राजगड पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय असलेल्या येथे निरूपम यांच्या तिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घातला होता आणि त्याला  जोडे मारण्यात आले आहे. यावेळी विभागप्रमुख अनंता सूर्यवंशी, महिला आघाडीच्या नेत्या हर्षा शिसोदिया, यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अंकुश पवार , मनोज घोडके, रामदास दातीर, परशुराम पाटील निखिल सरपोतदार, हर्षा फिरोदिया, कामिनी दोंदे, देवयानी वाघ, आरती खिराडकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.