ylliX - Online Advertising Network

#Job #Alert पहा कोठे आहेत नोकरीच्या संधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिव्याख्याता पदाच्या ४८ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विद्युत अभियांत्रिकी (२९ जागा), उत्पादन अभियांत्रिकी (८ जागा), उपयोजित यंत्रशास्त्र (११ जागा) अशा एकूण ४८ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मे २०१७ आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in तसेच http://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नेवल डॉकयार्डमध्ये ट्रेडसमेन मॅट पदाच्या ३८४ जागा
नेवल डॉकयार्डमध्ये ट्रेडसमेन मॅट (३८४ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध (दि. २९ एप्रिल ते ५ मे २०१७) झाल्यापासून २१ दिवस आहे. अधिक माहिती www.bhartiseva.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या १००८ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी (१०७ जागा), विक्रीकर निरीक्षक (२५१ जागा), पोलीस उप निरीक्षक (६५० जागा) अशा एकूण १००८ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ मे २०१७ आहे. अधिक माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in तसेच www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियंता पदांच्या १६९ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कार्यकारी अभियंता (३० जागा), सहायक अभियंता (१६९ जागा) अशा एकूण १९९ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मे २०१७ आहे. अधिक माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in तसेच www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

देना बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या ३०० जागा
देना बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या ३०० जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ मे २०१७ आहे. अधिक माहिती www.denabank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सीमा सुरक्षा दल संचालनालयात विविध पदांच्या १४३ जागा
सीमा सुरक्षा दल संचालनालयात सीनियर एअरक्राफ्ट मेकॅनिक (इन्स्पेक्टर) (१६ जागा), सीनियर एअरक्राफ्ट रेडिओ मेकॅनिक (इन्स्पेक्टर) (४ जागा), ज्युनियर एअरक्राफ्ट मेकॅनिक (सब-इन्स्पेक्टर) (४० जागा), असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब-इन्स्पेक्टर) (२३ जागा), असिस्टंट एअरक्राफ्ट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब-इन्स्पेक्टर) (१ जागा), सीनिअर फ्लाइट गन्नर (इन्स्पेक्टर) (४ जागा), ज्युनिअर फ्लाइट गन्नर (सब इन्स्पेक्टर) (८ जागा), सीनिअर फ्लाइट इंजिनीयर (इन्स्पेक्टर) (१ जागा), ज्युनिअर फ्लाइट इंजिनीयर (सब-इन्स्पेक्टर) (९ जागा), इन्स्पेक्टर / स्टोअरमन (१ जागा), सब-इन्स्पेक्टर (स्टोअरमन) (३ जागा), एचसी (स्टोअरमन) (९ जागा), कन्स्ट्रक्टर (असि. मेकॅनिक / क्लिनर) (२४ जागा) अशा एकूण १४३ जागा प्रतिनियुक्तीवर भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवार एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून एक वर्षापर्यंत अर्ज करु शकतात. अधिक माहिती www.bsf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.