Janta Curfew जनता ला देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद

जनता संचारबंदीला देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद

Janta Curfew कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज सका ळी ७ वाजल्यापासून जनतेनं स्वयंप्रेरणेनं लागू केलेली ही संचारबंदी रात्री ९ वाजेपर्यंत असेल.

जनता संचारबंदीमुळे सार्वजनिक वाहतूक कमी झाली असून जीवनाश्यक वस्तूंची दुकानं वगळता बाकी सर्व दुकानं, आस्थापना आणि बाजार बंद आहेत. राज्यातही जनता संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मुंबईत नेहमीच वर्दळ असणारा दादरचा फूल आणि भाजी बाजार पूर्णतः बंद आहे. लोकांनी स्वतःहून बाहेर न पडण्याची काळजी घेतली आहे. मुंबई ठप्प झाल्यासारखं वातावरण बघायला मिळत आहे.

नेहमीच वाहतूक कोंडीनं भरलेले रस्ते आज सामसूम आहेत.ठाणे, पालघर, नवी मुंबईत उपनगरीय रेल्वे गाड्या जवळपास रिकाम्या धावत आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, अमरावती, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, जालना, अहमदनगर, नाशिक, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, धुळ्यासह, वर्धा, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा, परभणी, नंदूरबार, उस्मानाबादसह राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्येही नागरिक स्वयंस्फुर्तीनं संचारबंदी पाळत असून, नागरिकांनी घरी राहण्यालाच प्राधान्य दिलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

सर्वच ठिकाणचे जॉगिंग ट्रॅक पूर्णतः रिकामे आहेत. जनता संचारबंदीमुळे राज्यात सर्वत्रच रस्ते ओस पडले आहेत. बस स्थानकं, रेल्वे स्थानकं,  बाजारपेठा, दुकानं, धार्मिक आणि पर्यटन स्थळं बंद असल्यानं सर्वत्रच शुकशुकाट आहे. नागरिक केवळ औषधं, जीवनावश्यक वस्तुंसाठीच घराबाहेर पडत असल्यानं रस्त्यांवर अत्यंत तुरळक वर्दळ दिसत आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसंच संचारबंदी यशस्वी व्हावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्तही असून, पोलीस ठिकठिकाणी गस्त घालताना दिसत आहेत. संध्याकाळी पाच वाजता देशभरातल्या सर्व नागरिकांनी घराबाहेर येत टाळ्या, थाळ्या, शंख आणि घंटानाद करत गेल्या काही दिवसात कोरोना विरोधात अविरत सेवा देणा-यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

मुंबईसह राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात नागरिक या कृतज्ञता उपक्रमात स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाले. अनेक प्रसिद्ध कलावंत आणि क्रीडापटूंनीही यात आपलं योगदान दिलं Janta Curfew

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.