मुंबई –Nashikonweb : Janhavi Kapoor | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhavi Kapoor) लोकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने बाॅलिवूडमध्ये (Bollywood) देखील आपली एक ओळख निर्माण केली आहे. जान्हवी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रचंड सक्रीय असते. तिच्या अकाऊंटवर तिचे भन्नाट लूकमधील फोटो पाहायला मिळातात.janhvi kapoor
सध्या जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) तिची बहिण खूशी कपूरसोबत (Khushi Kapoor) दुबईमध्ये आनंद घेत आहे. त्यांच्या आनंदी क्षणांचे फोटो देखील जान्हवीने शेअर केले असून यामध्ये तिने दुबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील (Dubai Beach) फोटो शेअर केले आहेत. यात तिने लाल रंगाची बिकनी परिधान केली आहे. या बिकनीवर लाल गुलाबाची फुलं आणि हिरव्या रंगाच्या पानांची डिजाईन आहे. तर पोस्ट केलेल्या बिकनीमधील फोटोला जान्हवीने ‘लुंगी डान्स’ (Lungi Dance) असं कॅप्शन देखील दिलं.janhvi kapoor
जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एक फोटो सुर्य मावळतांना खूशी आणि तिची सावली असा फोटो शेअर केला आहे. तर या पोस्टमध्ये काही फोटो ती ‘जेट स्की’चा (Jet Ski) आनंद घेत असतानाचे सुद्धा आहे.जेट स्कीचा आनंद घेत असताना जान्हवीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.केवळ आपलेच नाही तर जान्हवीने बहिण खुशीचे देखील फोटो शेअर केले आहेत.ज्यामध्ये खुशीने एका ब्रालेट परिधान केली असून शाॅर्ट डेनिम देखील परिधान केली आहे.janhvi kapoor