ylliX - Online Advertising Network

जेलरोड : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, डोक्यात मुसळ घातली

आईच्या बचावला आलेल्या मुलांवरही प्राणघातक हल्ला

नाशिक : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मद्यधुंद पतीने पत्नीचा डोक्यात मुसळ घालून खून केल्याची घटना जेलरोडच्या शिवरामनगर परिसरातील अपूर्वा कॉलनीत घडली आहे. घरात असताना ही घटना घडली त्यावेळी आईला वाचवण्यासाठी धावलेल्या दोघा मुलांनाही आरोपीने गंभीर जखमी केले असून उपनगर पोलिसांनी आरोपी अण्णासाहेब निवृत्ती गायखे (वय ५५) याला अटक केली आहे. Jail Road Wife murdered character suspicions pestle attack

नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. या घटनेत बुधवारी (दि. १०) संध्याकाळी साडेसात वाजता घरी येऊन चारित्र्यावर संशय घेत पत्नीशी वाद घालू लागले. वाद सुरु असतानाच आरोपीने स्वैपाकघरात जात मुसळ आणली आणि पत्नी ज्योतिका यांच्या डोक्यात घातली. घाव इतका जोरदार होता कि प्रचंड रक्तस्राव होत ज्योतिका यांचा जागीच मृत्यू झाला.

घटना घडत असताना घरात असलेल्या मुलगा अजिंक्य आणि मुलगी धनश्री यांना हा प्रकार आरडाओरडा होतान कळताच आईला वाचवण्यासाठी धावले. मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीने दोघांवरही प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केले. आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना कळताच त्यांनी उपनगरपोलिसांना खबर दिली. दोघांनाही जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटना कळताच परिमंडळ दोनचे उपयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, विभाग ४ चे सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक हिरे, घटनास्थळी दाखल झाले.

मुलगा अजिंक्य याने वडिलांविरुद्ध आईची हत्या आणि बहिणीवर प्राणघातक हल्ला केल्याची फिर्याद दाखल केली असून गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत. Jail Road Wife murdered character suspicions pestle attack

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.