भरदिवसा जेलरोड परिसरात डोक्यात धारदार हत्याराने वार करत एकाचा खून करण्यात आला आहे. हा खून अनैतिक सबंधातून झाला असा प्राथमिक अंदाज व चर्चा आहे. खुनी संशयित आरोपी स्वतःहून पोलिसांना शरण आला आहे. jail road man murder pawarvadi road today afternoon police arrested

सविस्तर वृत्त असे की, जेलरोड ते पवार वाडी दरम्यान भैरवनाथ नगर येथे रस्त्यावर धारधार कुऱ्हाड सदृश्य हत्याराने डोक्यात घाव करत युवकाचा खून केला आहे. यामध्ये संदीप नरसाळे या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार दुपारच्या वेळी घडला असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. खून झाला त्या रस्त्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.jail road man murder pawarvadi road today afternoon police arrested

पोलिसांना घटना समजताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. हा खून अनैतिक स्बंधातून झाला असावा असा अंदाज वर्तवला जातो आहे. तर या खुनातील संशयित असलेला दीपक पवार नामक व्यक्ती नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे स्वतःहून हजर झाली असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ना.रोड स्टेशन येथे खुनाचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे.
One thought on “अनैतिक सबंध : जेलरोड परिसरात एकाचा खून, आरोपीस अटक”