राज्यात करोना काळात परिस्थिती हाताळणीवरून राज्यात अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या होत आहेत. आता नाशिकचाही क्रमांक लागला असे दिसून येते आहे. यात आत महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच शासनाने बदली केली. त्यांच्या जागी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा आदेश प्राप्त झाल्यानंतर दुसर्याच दिवशी जाधव यांनी महापालिकेत येऊन कार्यभार स्वीकारला आहे. मावळते आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.नाशिक पालिकेचा निरोप घेताना मावळते आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिककरांना धन्यवाद दिलेत. पदभार स्वीकारल्यानंतर नवे आयुक्त कैलास जाधव यांनी नाशिककरांना समाधान मिळेल असे काम करुन अपेक्षांच्या कसोटीवर उतरण्याचं आश्वासन दिलं आहे. Municipal Commissioner
५ डिसेंबर २०१८ रोजी गमे यांनी तुकाराम मुंडे यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता.
-दोन वर्षांत त्यांनी सर्वाना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला.
-घरपट्टीतील वाढ,
-बांधकामांचे ऑनलाइन प्रस्ताव दाखल करणे,
-बससेवा, रुग्णालयांचे नूतनीकरण आदी विषय त्यांनी कौशल्यपूर्वक मार्गी लावले.
-कैलास जाधव यांनी १९९८ मध्ये निफाड प्रांतधिकारी म्हणून कामकाज बघितले.
-२००० ते २००४ या कालावधीत ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले.
-दीर्घकाळ कामकाज केल्यामुळे नाशिकमधील राजकीय, तसेच प्रशासकीय वर्तुळात चांगले संबंध आहेत Municipal Commissioner