Bala Nandgaonkar बाळा नांदगावकर मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश करणार झाले स्पष्ट

पुण्यातील मनसेच्या  नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे ) यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अशातच आता मनसेला मुळापासून हादरवणारा मोठा धक्का मिळणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर  प्रचंड व्हायरल  होत आहेत. राज ठाकरे  यांच्या मर्जीतले आणि मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत सुरवातीपासून असलेले  बाळा नांदगावकर  शिवसेनेत  प्रवेश करणार असल्याचे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. यावर मोठा गोंधळ निर्माण झाला आणि त्यावर  स्वत: बाळा नांदगावकर  यांनी स्पष्टीकरण दिले आहे.Bala Nandgaonkar

मनसे नेते  बाळा नांदगावकर मनसेत सक्रिय नसले तरी एकेकाळी त्यांच्या शब्दाला पक्षात मोठी किंमत होती. राज्यात मनसेचे वारे असताना निवडून आलेल्या पक्षाच्या आमदारांमध्ये  बाळा नांदगावकर विजयी झाले होते . राज ठाकरे यांच्यापर्यंत थेट जाऊ शकणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांना पक्षात विशेष स्थान आहे. परंतु हेच बाळा नांदगावकर परत त्यांचा मुल पक्ष शिव्सेबेत ‘घरवापसी’ करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांनी एका  न्यूज  पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू स्पष्टपणे मांडली., ते सध्या  राज ठाकरे यांच्या सोबत  पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. तेव्हा ते म्हणाले आहेत कि , नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावेळी मी राज ठाकरे यांच्यासोबत होतो. राज ठाकरे पुण्याला रवाना झाले तेव्हा मी मुंबईत परत आलो आहे . माझ्या मतदारसंघातील मनसेच्या कार्यालयाचे 18 डिसेंबरला राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.त्याच्या तयारीसाठी मी मुंबईत परत आलो.मात्र मी पुण्याच्या दौऱ्यात न दिसल्याने काहीजणांनी मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठवल्या.मात्र, त्यामध्ये तथ्य नसल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.Bala Nandgaonkar

 

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक, औरंगाबाद आणि पुणे दौरा सुरू आहे. नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यादरम्यान मी राज ठाकरे यांच्या सोबत होतो. पुण्याला जेव्हा राज ठाकरे आले तेव्हा मी मुंबईला परतलो. मुंबईत १८ तारखेला माझ्या मतदार संघात कार्यालयाचे उदघाटन साहेबांच्या हस्ते असल्याने मी तयारीसाठी मुंबईत आलो आहे. मी पुण्याच्या दौऱ्याला गेलो नसल्याने बाळा नांदगावकर स्वगृही परतणार अशा बातम्या आणि काही मेसेज फिरत आहेत,” अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

 

मागील काही दिवसांपासून काही स्वयंघोषित सुत्रांनी माझा पक्ष त्याग व परस्पर पक्ष प्रवेशाची बातमी सुद्धा चालवली. सोशल मीडियाच्या युगात अशा बातम्या किती जोरदार पसरतात. हे आपणास माहीतच आहे, असं सांगत नांदगावकर यांनी याबाबत खुलासा करणारी पोस्ट फेसबूकवर टाकली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘तेरे नाम से शुरू, तेरे नाम पे खतम… ही गाण्याची ओळ टाकत आपण राज ठाकरे यांच्यासोबत अखेरपर्यंत एकनिष्ठ राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

‘मागील अनेक वर्षांत राजकारणात पक्ष निष्ठा, व्यक्ती निष्ठा हे विषय गौण होऊन फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वरचेवर पक्ष बदलणारे जरी असले तरी सगळेच असे नसतात. खरे तर अशा बातम्या, अफवा या मुद्दामच पेरल्या जातात पण यात अशा बातम्या पेरणारे त्यांचेच हसू करून घेतात. माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित आहे व राहील. त्यामुळे त्याबद्दल मला काहीच सांगायची गरज नाही,’ असं नांदगावकर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.