ylliX - Online Advertising Network

पंचवटी एक्सप्रेस मध्ये महिला दिनाचा उत्साह, कर्तुत्ववान महिलांची माहिती देणारे पोस्टर्स

प्रतिनिधी : नाशिक येथून नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या शेकडो चाकरमानी महिलांची साथीदार असलेली पंचवटी एक्सप्रेस आज (दि.८) विविध कर्तुत्ववान महिलांच्या प्रतिमेने सजवली गेली. international womens day celebration panchavati express feminine women frames nashik

जागतिक महिला दिनाचे औचित्त्य साधून मध्य रेल्वे भुसावळ विभागातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

मनमाड आणि नाशिक येथून रोज प्रवास करीत असतांना बाईच बाईपण आणि घर सावरताना संघर्षाची साथीदार म्हणून पंचवटीस स्थान आहे. दररोज शेकडो महिला या गाडीने प्रवास करीत असतात.

 

आजच्या महिला दिनी त्यांच्या या संघर्षाला सलाम करण्यासाठी मध्य रेल्वे तर्फे प्रत्येक महिलेला बिल्ला देऊन त्यांचा सम्मान करण्यात आला.

मध्य रेल्वे यांत्रिक विभाग, मनमाड तर्फे महिला प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. अविरत चालेल्या संघर्षमय प्रवासात रेल्वे सतत आपल्या सेवेत असल्याची ग्वाही देण्यात आली.

मंडल यांत्रिक अभियंता सुदीप प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड सहायक यांत्रिक अभियंता अंकित आणि रेलवे अभियंता एच. डी. डोंगरे, एम. के. शिवहारे, प्रमोद शिरापूरे आणि रेलवे कर्मचारी ज्ञानेश पिसे, तेजस्वीनि गडाख, मीराबाई निकम या उपस्थित होत्या. मुंबईला कार्यरत असलेल्या महिला पोलीस मनीषा साळवे यांनी याकामी सहकार्य केले.

international womens day celebration panchavati express feminine women frames nashik

NashikOnWeb.com चे फेसबुक पेज लाईक करा… fb.com/NashikOnWeb

आमच्या व्हाटसअप ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये सामील होण्यासाठी 8830486650 हा क्रमांक आपल्या फोन मध्ये सेव्ह करून SUBSCRIBE किंवा Hi असे लिहून पाठवा आणि मिळवा नाशिकचे अपडेट्स…

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.