नाशिक पोलिस : स्टेशन अंतर्गत पोलिस अधिकारी बदल्या

नाशिक शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत पोलिस अधिकारी वर्गाच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये शहरातील म्हसरूळ, इंदिरानगर, सातपूर, उपनगर, मुंबई नाका या पोलीस ठाण्यांमध्ये नव्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नियुक्त करण्यात आल्या आहेत.

म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे सुभाषचंद्र देशमुख, नियंत्रण कक्षामध्ये असलेले पोलीस निरीक्षक फुलदाय भोये, वाहतूक शाखेचे राजेश आखाडे यांची सातपूरच्या गुन्हे शाखेत बदली झाली आहे.उपनगरचे अशोक भगत यांची विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.

भद्रकालीचे पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांची दहशतवाद विरोधी पथकामध्ये उपनगरचे (गुन्हे) पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

सुनील नंदवाळकर यांची मुंबई नाका पोलिस स्टेशन येथे बदली.

मुंबई नाक्याचे मंगलसिंग सूर्यवंशी यांची भद्रकाली पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे.

पोलिस नियंत्रण कक्षामधील बाजीराव महाजन यांची उपनगर पोलीस ठाण्यात  बदली झाली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.