प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये हलीमे सुल्तान म्हणजेच राणीची भूमिका साकारणारी टर्किश अभिनेत्री एसरा बिलगिचने एका इनर गार्मेंट कंपनीची जाहिरात केली आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर आगडोंब उडाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.Inner Garment
मराठी शब्दकोशातील आगडोंब व्याख्या
आगडोंब—पु. १ आगीचा भडका. २ (ल.) मोठें संकट; अतिशय त्रास. [आग + डोंब]
महिलांच्या अंतर्वस्त्रांची एक 36 सेकंदांची जाहिरात आहे. यामध्ये मॉडेल एका प्रसिद्ध ब्रँडच्या ‘ब्रा’चं प्रमोशन करताना दिसून येते. याच जाहिरातीवरून पाकिस्तानात सध्या गोंधळ उडालेला आहे. पाकिस्तानी नागरिक सोशल मीडियावर या जाहिरातीवर जोरदार टीका करत असल्याचं दिसून येत आहे.पाकिस्तानी सोशल मीडिया युझर्सचा आक्षेप जाहिरातीपेक्षाही जास्त मॉडेलवर आहे. कारण या जाहिरातीतील मॉडेल दुसरी तिसरी कुणी नसून इसरा बिलगिच ही आहे.
जाहिरात पहायला व्हिडियो पहायला लिंक क्लिक क रा.
https://www.instagram.com/tv/CbSvneijLQQ/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading
पाकिस्तानातील ट्रोलर एसरा बिल्गिचला सभ्य कपडे घालण्याचा सल्ला देत आहेत. याआधीही अनेक पाकिस्तानी अभिनेत्री ऑनलाइन ट्रोलच्या शिकार झाल्या आहेत. त्यांच्या कपड्यांवरून अभिनेत्रींना अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. याचमुळे अनेक अभिनेत्रींनी सोशल मीडियावर अकाउंटवर कमेन्टचं सेक्शन पूर्णपणे बंद केलं.
इसरा बिलगिच कोण आहे?
एर्तुगरूलची गाजीची प्रेमिका आणि नंतर पत्नीची भूमिका बजावणाऱ्या बिलगिचचा जन्म 1992 मध्ये टर्कीची राजधानी अंकारा येथे झाला.

फोटो स्रोत,INSTAGRAM
तिने हेजतेप युनिव्हर्सिटी येथून पुरातनशास्त्राची पदवी प्राप्त केली. नंतर अंकारा येथील बिलकिनेत युनिव्हर्सिटी येथून आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयात पदवी मिळवली. आता ती सध्या कायद्याचं शिक्षण घेत आहे.दिरलिस एर्तुगरूल मालिकेत हलीमे सुल्तान ही तिची पडद्यावरची पहिलीच भूमिका होती. याच भूमिकेने बिलगिचला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.Inner Garment