नाशिक – रिअल इस्टेट व्यवसायातील अग्रगण्य कंपनी सम्राट ग्रुपला ग्लोबल रिअल इस्टेट कॉंग्रेस च्या नाशिक इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन लीडरशिप अवॉर्डस 2018 ने सन्मानित करण्यात आले . सम्राट ग्रुप चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुजॉय गुप्ता म्हणाले, की या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी झालेली निवड हा मोठा सन्मान आहे. हा पुरस्कार सम्राट कुटुंबातील प्रत्येकाच्या अपवादात्मक प्रयत्नांचे प्रदर्शन करतात. सुरु झाल्यापासून, सम्राट ग्रुप आपल्या निराधार मूल्यांसह, उत्साही संघकार्यासाठी आणि अग्रगण्य निश्चयासह एक दीर्घ मार्गाने आला आहे. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुजॉय गुप्ता यांच्या वतीने सीओओ सुधीर मेटकर आणि वरिष्ठ वास्तुविशारद तपस्या बेडाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.Infrastructure and Construction Leadership Award Samrat Group Nashik News
नाशिक इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन लीडरशिप अवॉर्डमुळे सम्राट च्या गुणवत्तेवर अजून एक मोहोर उमटली असून निवडीसाठी वापरण्यात येणा-या निकषांमध्ये प्रकल्प आणि सेवांची उत्कृष्ट गुणवत्ता, आर्थिक सुसंगतता आणि स्थिरता, बाजारपेठेतील परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, स्थानिक समुदायांसाठीचे उत्तरदायीत्व यांचा समावेश आहे.या पुरस्कारांसोबतच सम्राट ग्रुपला नाशिकचे सर्वोत्कृष्ट नियोक्ता पुरस्कार 2018 नेही सन्मानित करण्यात आले, इंडस्ट्रीमधील सर्वोत्तम एचआर पद्धतींचा अवलंब केल्या मुळे हा सन्मान मिळाला . तसेच सुधीर मेटकर – सीओओ यांना अनुकरणीय नेतृत्व पुरस्कार , श्रुती गुप्ता यांना उत्कृष्ट महिलां कर्मचारी ,भविष्यातील नेतृत्व म्हणून श्रीधर पुजारी आणि तपस्या बेडाळे यांना “महिला सुपर अचीवर पुरस्कार” प्रदान करण्यात आला.Infrastructure and Construction Leadership Award Samrat Group Nashik News
निवड समितीत वरिष्ठ नेते, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश आहे. त्यात , द इकॉनॉमिक टाइम्स माजी प्रमुख डॉ. अरुण अरोरा, आंतर्दीषा च्या अध्यक्षाप्रा. इंदिरा पारिखडॉ. ग्रुप सीआरओ – फझलानी ग्रुप ऑफ कंपनीज चे चंद्रा माऊली द्विवेदी, डेल ईएमसी चे मार्केटिंग ऑपरेशन्सचे प्रमुख सुदर्शन आर आणि सिस्कोचे मुख्य विपणन अधिकारी नंद किशोर बदामी यांचा समावेश होता.या कार्यक्रमात पुणे, औरंगाबाद आणि नाशिकच्या विविध रिअल इस्टेट तसेच इतर उद्योगांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.