इंदिरानगर : दोन लाखाची लूट करून व्यावसायिकाचा खून

नाशिक : इंदिरानगर परिसरातील बापू बंगला बस थांब्याजवळील सुपर ग्राहक बाजार या दुकानाचे मालक अविनाश महादू शिंदे (35) यांच्या हातातील रोकड हिसकावताना झालेल्या चाकुहल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री १०:३० च्या सुमारास घडली. Indiranagar robbers murdered businessman

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू बंगला परिसरात सुपर ग्राहक मार्केटचे मालक अविनाश शिंदे दिवसाचा हिशोब करून दुकान असलेल्याच इमारतीत असलेल्या आपल्या निवासी परतत होते. मात्र त्याचवेळी लुट करण्याच्या उद्देशाने पार्किंगमध्ये दाबा धरून बसलेल्या संशयितांनी त्यांच्या हातातील रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिंदे यांनी विरोध केला असता संशयितांनी त्यांच्यावर चाकूहल्ला केला. या झटापटीत शिंदे गंभीर जखमी झाले. रोख रक्कम असलेली पिशवी घेत हल्लेखोरांनी पोबारा केला.

जखमी शिंदेंना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना मयत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्तांसह इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

शहरात लागलीच अस्तार्कातेचा इशारा देण्यात आला असून संशयित पसार झाल्याच्या सर्व शक्य मार्गिकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.

याबाबत संशयितांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात लुट आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

indiranagar robbers murdered businessman
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “इंदिरानगर : दोन लाखाची लूट करून व्यावसायिकाचा खून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.