ylliX - Online Advertising Network

‘इंडियन सायकल डे’:नाशिक सायकलिस्ट पर्यावरण संवर्धन सायकल रॅलीचे मुंबईकडे प्रस्थान

गांधी जयंती निमित्त गेटवे ऑफ इंडिया येथे साजरा करणार ‘इंडियन सायकल डे’

नाशिक : नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन, सिटीझन नागरी पतसंस्था, महाराष्ट्र पर्यटन विकास महामडंळ व इंडीया टुरिझम (अत्युल्य भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने वेदिका वेल्फेअर फाउंडेशन, ग्रेप काँटी, अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्स, दातार स्विच गिअर यांचे विशेष सहकार्याने गांधी जयंती 2 ऑक्टोबर भारतीय सायकल दिवस म्हणून साजरा व्हावा या उद्देशाने 1 ते 2 ऑक्टोबर अशी दोन दिवसीय नाशिक ते मुंबई अशी 186 किमीच्या पर्यावरण संवर्धन सायकल रॅलीत 80 हुन अधिक सायकलिस्टने मुंबईकडे उत्साहात प्रस्थान केले.indian cycle day nashik cyclist tour to mumbai 2 october starts

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथून आज (दि. 1) सकाळी 6 वाजता प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्त अमित सिंग, एमटीडीसीचे सहव्यवस्थापक आशुतोष राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते हरवा झेंडा दाखवत रॅलीस प्रारंभ करण्यात आला.

नाशिक जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी रवी नाईक, भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, सिटीझन बँकेचे विलास पाटील, माजी शहर अभियंता यु. बी. पवार, किरण चव्हाण, लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, क्रेडाईचे नवनियुक्त Aअध्यक्ष उमेश वानखेडे, उमेश भदाणे, नगररचना विभागाच्या सहआयुक्त प्रतिभा भदाणे, नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया तसेच डॉ. रौंदळ दाम्पत्याने टॅण्डम सायकल वर या रॅलीमध्ये सहभाग घेतला.indian cycle day nashik cyclist tour to mumbai 2 october starts

पहिल्या दिवशी घेाटी, इगतपूरी, शहापूर मार्गे पहिल्या दिवशी 124 किमीचे अंतर पूर्ण करत भिवंडी फाटा येथील शांग्रीला रिसॉर्ट येथे मुक्कामी राहून मंगळवारी 2 ऑक्टोबर रोजी सर्व सायकलिस्टस गेटवे ऑफ इंडिया येथे पोचतील.रॅलीच्या प्रथम टप्प्यात इगतपुरी येथे रॅलीत सहभागी नाशिक सायकलिस्ट्सच्या सदस्यांचे इगतपुरी सिटीझन फोरम तर्फे जंगी स्वागत करण्यात आले. ऑक्टोबर हिटचा चटका यावेळी सर्व सायकलीस्टला जाणवला.indian cycle day nashik cyclist tour to mumbai 2 october starts

नाशिक सायकलिस्ट्स गेल्या 6 वर्षापासून 2 ऑक्टोबर गांधी जयंती हा दिवस इंडियन सायकल डे म्हणून साजरा करण्यात यावा.यासाठी प्रयत्न करीत आहे. या दिवशी जनतेस पर्यावरण, स्वच्छता व नागरी कर्तव्य असे संदेश दिला जातो. नाशिक शहरात विविध रॅलीचे आयोजन केले जात होते. मात्र ही चळवळ देशभरात नेण्याच्या उद्देशाने संपूर्ण देशात 2 ऑक्टोबर इंडियन सायकल डे साजरा व्हावा असा मानस ठेवून वर्ष 2016 पासून नाशिक ते मुंबई सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. ही रॅली यशस्वी होण्यासाठी मुकेश ओबेरॉय, प्रीतेश पाटील, डॉ. मनीषा रौंदळ, विश्वास पारनेरकर, रवींद्र दुसाने आदि प्रयत्न करत आहेत.indian cycle day nashik cyclist tour to mumbai 2 october starts

आज गेटवे ऑफ इंडिया येथे करणार जनजागृती

2016 सालापासून 2 ऑक्टोबर हा दिवस इंडियन सायकल डे साजरा व्हावा या उद्देशाने नाशिक मुंबई सायकल रॅलीचे आयोजन होत आहे. या सायकल चळवळीतीळ रॅलीच्या तिसऱ्या पर्वामध्ये नाशिक सायकलिस्ट्सला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच अतुल्य भारतची साथ मिळत आहे. गेटवे ऑफ इंडिया येथे मंगळवारी ११ वाजता पोहचून पर्यटकांत स्वच्छता, पर्यावरण आणि मानवी कर्तव्ये यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.indian cycle day nashik cyclist tour to mumbai 2 october starts
त्यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात पर्यटन मंत्री जयकुमार रावल तसेच राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तेथे एमटीडीसीचे सह व्यवस्थापक आशुतोष राठोड तसेच अन्य अधिकारीवर्ग यांच्या उपस्थितीत नाशिक सायकलिस्टसच्या सदस्यांकडून 2 ऑक्टोबर गांधी जयंतीचा हा दिवस इंडियन सायकल डे म्हणून घोषित करण्यात यावा या आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

indian cycle day nashik cyclist tour to mumbai 2 october starts
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.