ylliX - Online Advertising Network

नाशिक : उमेदवाराने भरली चिल्लरच्या स्वरूपात १० हजार रुपयांची निवडणूक अमानत रक्कम

नाशिक : प्रतिनिधी : नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार शिवाजी वाघ यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी 10 हजारांची चिल्लर आणली होती. त्यांनी अनामत रकमेत चिल्लर असल्याची माहिती देताच अधिकारी वर्गाला धक्का बसला होता. independent candidate bought chiller deposit amount loksatha election 2019 nashik constituency

नाशिक लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्यासाठी मंगळवारी (दि.9) दुपारी 3 वाजता शेवटची मुदत होती. ही  मुदत संपण्यापूर्वी अर्धा तास अगोदर म्हणजे अडीच वाजता वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या दालनात प्रवेश केला होता.

त्यांनी अनामत म्हणून आणलेली रक्कम तपासून मगच भरावी, अशा सूचना अधिकाऱ्यांनी वाघ यांना दिल्या. वाघ यांनी मग तेथेच चिल्लर मोजण्यास सूरवात केली होती. यामुळे जिल्‍हाधिकाऱ्यांच्या दालनात अधिकारी आणि शिवाजी वाघ चिल्‍लर मोजत होते.

एकूण २५ हजाराच्या या अनामत रकमेत एक रुपया, ५ रुपये आणि १० रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. तर १५ हजार ही नोटांच्या स्वरुपातील रक्कम होती.

हा एक प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्टंट असल्याची चर्चा आज दिवसभर शहरात रंगली. गेल्या निवडणुकीतही अशीच घटना घडली होती. २०१४ साली नाठे नामक एका इच्छुक अपक्ष उमेदवाराने साडेबारा हजारांची चिल्लर अनामत रकमेसाठी आणली होती. निवडणूक यंत्रणेने अखेर अडीच तासांचा वेळ खर्च करून चिल्लर मोजल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला होता.

नाशिक शहरात हा आज चर्चेचा विषय झाला होता.

independent candidate bought chiller deposit amount loksatha election 2019 nashik constituency
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.