ylliX - Online Advertising Network

गंगापूर रोड : मसाज पार्लरवर छापा, जानेवारीपासून ही तिसरी कारवाई

शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर रोड परिसरात एका इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला देहविक्रीचा व्यवसाय पोलिसांनी बुधवारी उशिरा रात्री अचानक धाड मारून थांबविला आहे. याच परिसरात पोलिसांनी जानेवारीपासून ही तिसरी कारवाई केली आहे. immoral massage parlor gangapur road nashik police raid February 2019

याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली की, गंगापूर रोडवरील एका व्यावसायिक संकुलात मसाज पार्लर आणि स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला देहविक्रीच्या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला. येथून पोलिसांनी तीन पीडित तरूणींची सुटका केली आहे. तर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल करून एका महिलेस अटक केली आहे.

जयश्री सोमनाथ अहिरे (रा. उत्तमनगर) व ज्योत्स्ना राजेंद्र नाईक (रा. गंगापूर रोड) अशी संशयित महिलांची नावे आहेत.

गंगापूर रोड येथील रचना कॉम्प्लेक्सच्या तळ मजल्यावरील गाळा क्रमांक ५ व ६ मध्ये वीशीतल्या पिडीत तरूणींकडून मसाज पार्लरच्या नावाखाली संशयित अहिरे वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरील ठिकाणी छापा टाकला.

या छाप्यात तीन पीडित तरूणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहेत.

immoral massage parlor gangapur road nashik police raid February 2019
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.