Nashik Covid Helpline होम क्वारंटाईन कोरोनाबाधितांसाठी आयएमए नाशिक कोविड हेल्पलाईन

नाशिक : कोरोना महामारीच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे आरोग्‍य व्‍यवस्‍थेवर ताण आला आहे. या पार्श्वभूमीवर गृहविलगीकरणात (होम आयसोलेशन)मध्ये राहणाऱ्या कोरोनाबाधित रुग्‍णांना मार्गदर्शन उपलब्‍ध केले जाणार आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेतर्फे ‘आयएमए नाशिक कोविड हेल्‍पलाइन’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.IMA Nashik Covid Helpline for Home Quarantine Nashik Covid Helpline

ऑडिओ, व्डिडिओ कॉलद्वारे तज्‍ज्ञ डॉक्‍टरांचा जाणून घेता येईल सल्‍ला

सर्व फिजिशियन डॉक्टर्स मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या कोविडबाधित रुग्णांची सेवा करण्याचे काम अविरत करत आहेत. अशा वेळी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या विलगीकरणात असलेल्‍या नातेवाइकांसाठी मदत, योग्य सल्ला आणि उपचार मिळवून देण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या योजनेत सहभागी होताना शंकांचे निरसन दूर करून घेत स्‍वतःचे व कुटुंबीयांचे आरोग्‍य जपावे आणि कोरोनाविरोधातील या लढ्यात सहभागी व्‍हावे, असे आवाहन आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी केले आहे.

दुपारी दोन तास (10 am to 12 pm) आणि
संध्याकाळी दोन तास (4 pm to 6pm) ह्या वेळेत
ऑडिओ अथवा विडिओ कॉलच्या माध्यमातून खालील तज्ञ डॉक्टरांशी ह्या हेल्पलाईन वरून संपर्क साधता येईल.

आयएमए नाशिक कोविड हेल्पलाईन

तुम्ही ह्या विषयांवर आमच्या तज्ञ डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता:-

🔴 विलगीकरणात काय करावे/करू नये

🔴 विलगीकरणातील औषधोपचार आणि आहार

🔴 विलगीकरणात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी

🔴 गर्भवती महिला आणि कोव्हिड

🔴 लसीकरण

🔴 धोक्याची लक्षणं आणि डॉक्टरांना त्वरित कधी भेटावे

ही आहे यादी 

🔴 गरज नसेल तर उगीच डॉक्टर यांना त्रास देऊ नका असे आवाहन आम्ही nshikonweb  तर्फे करत आहोत. ज्याना गरज आहे त्यांना संधी मिळू द्यावी. Nashik Covid Helpline

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.