नाशिक- जुन्या कसारा घाटात इंडिकाने आज (दि. २५) रात्री जवळपास नऊ वाजता अचानक पेट घेतला आहे. या आगीमध्ये कार जळून खाक झाली आहे. जेव्हा कारला आग लागणी तेव्हा तिच्या मध्ये तीन लोक होते. मात्र यावेळी पेट्रोलिंग करत असलेल्या पीक इन्फ्राच्या (Peak Infra) सेफ्टी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे गाडीतील तिघांना वाचवण्यात यश आले आहे. यावेळी गाडीच्या काचा फोडून त्या तिघांना बाहेर काढेल होते. त्यामुळे या गाडीतील तिघांचे जीव वाचवण्यात यश आले आहे.
जुन्या कसारा घाटातुन मुबंई हुन नाशिक कडे येत असतांना इंडिका गाडीने लतीफवाडी चढाच्या ठिकाणी अचानक घेतला होता. गाडीने पेट घेतल्यानंतर ती पाठीमागे येत रस्त्याकडेला असलेल्या छोट्या नाल्यात गेली. त्याचवेळी याठिकाणी पेट्रोलिंग करत असलेल्या पीक इन्फ्रा सेफ्टी टीमला झालेला प्रकार लक्षात येताच कंट्रोल रूम ऑफिसर यांनी धाव घेऊन गाडीच्या काचा फोडत ड्रायव्हरसह दोघांना बाहेर काढले आहे.
त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहे. यावेळी महिंद्राच्या अग्निशमन दलाचे गाडी येऊन आग विझविण्यास मदत केली. सदर गाडी गॅस किट होती त्यामुळे आग लागली होती आणि लगेचच ती पसरली.
यात गाडी जाळून पूर्ण खाक झाली आहे. या प्रकरणात कंट्रोल रूम ऑफिसर समीर चौधरी, सुरेश जाधव, सुनील सोनवणे, मुजाहिद शेख यांनी प्राण वाचवले आहेत.