इगतपुरीत भात आवणी अंतिम टप्प्यात , गाव पाड्यांमध्ये भात लावणीच्या कामांना वेग

नाशिक : नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात पावसाने  दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच गाव पाड्यांमध्ये भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यात 124 गावे आणि 150 हून अधिक पाडे आहेत. 27 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात भाताची लागवड केली जाते येथील शेतकरी प्रमुख्याने ओम 125,इंद्रायणी ,सह्याद्री,सोनम,हाळी,आर २४, एक हजार आठ,राधा फुले ,आणि मसुरी आदी भाताच्या वाणांची लागवड करून उत्पन्न घेतात.इगतपुरचा  इंद्रायणी हा भाताचा वाण तर राज्यभर प्रसिद्ध आहे.
भाताचे कोठार म्हणून इगतपुरी ओळखले जाते.  इथे पारंपरिक बियाणे तसेच सुधारित बियाणे अशा दोन्ही पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केली जाते. तालुक्यात 28 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. त्यापैकी जवळपास 80 टक्के भात पिकाची लावणी पूर्ण झाली आहे, तसेच सुरवातीला चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे भात शेतीला चांगली वाव मिळाली आहे समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे सरासरीच्या तुलनेने इगतपुरी तालुक्यात यावर्षी 70 टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान इगतपुरी तालुक्यात जवळपास 27 हजार हेकटरवर भात पेरण्याझाल्या असून लागवड देखील आजपर्यंत 90 टक्यापर्यंत झाली आहे.
गरी कोळपी म्हणून प्रसिद्ध असलेल्या व अत्यंत चविष्ट असलेल्या  या बारीक तांदुळाची दिवसेंदिवस लागवड कमी होत आहे. इगतपुरी तालुक्यात काही तुरळक ठिकाणी  या जातीची लागवड केली आहे. या पारंपरिक बियाण्याऐवजी दप्तरी, ओम 125, 1008 या सुधारित भात बियाण्याची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. तसेच गरी कोळपी, आर चोवीस  या पारंपरिक भात बियाण्याचे अस्तित्व दिवसेंदिवस कमी होत आहे. इगतपुरी तालुक्यात प्रामुख्याने भात शेती हे मुख्य पीक घेतले जाते याबरोबर इतर पिकांमध्ये नागली, वरई, भुईमूग हे पिके घेतली जातात मात्र यामध्ये भात शेतीचे प्रमाण अधिक असल्यामुळे बाकीचे पिके फक्त 10 टक्के घेतली जातात तर त्यामध्ये भाजीपाला पिके देखील आता मोठ्या प्रमाणात घेतले जातात.
सरासरी 3400 ते 4000 मिमी पाऊसाची नोंद होणाऱ्या इगतपुरी तालुक्यात आतापर्यंत 2168 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे म्हणजे सरसरी 65 ते 70 टक्के पाऊस झाल्यामुळे भात शेतीच्या कामांना वाव मिळाली व तालुक्यात 90 टक्के भात लागवड झाली आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.