ylliX - Online Advertising Network

इगतपुरी : रिसॉर्टमध्ये कथित पत्रकार संघटनेच्या अध्यक्षाचा बारबालांसह धिंगाणा; दहा ताब्यात

नाशिक : इगतपुरी परिसरातील तळेगाव शिवारातील मिस्टिक व्हॅली या रिसॉर्टच्या आवारात रंगविलेली डान्स पार्टी पोलिसांनी उधळली आहे. यात मुंबई परिसरातून तोकड्या कपड्यात नाच करण्यासाठी आणलेल्या 6 मुलींसह नाशिकमधील एका स्वयंघोषित पत्रकार संघाचा अध्यक्ष डॉ. राहुल जैन-बागमार आणि इतर 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. Igatpuri resort dance party 10 people arrested fake journalist barbala

दरम्यान, कारवाई होऊ नये म्हणून स्वयंघोषित पत्रकार डॉ. बागमार याने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगून पोलिसांशी दबाव आणण्याचा प्रयत्न करत धिंगाणा घातला.

याप्रकरणी इगतपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Igatpuri resort dance party 10 people arrested fake journalist barbala

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात असलेल्या मिस्टीक व्हॅली परिसरातील नऊ क्रमांकाच्या बंगल्याच्या परिसरात रस्त्यावर डीजेचा दणदणाट करुन बारबालांच्या नाच सुरू होता.

बंगल्याच्या आवारात कर्कश डीजे सह तोकड्या कपड्यांमध्ये अश्लिल स्वरुपाचा धिंगाणा सुरू असल्याचा प्रकार पोलीस नाईक सचिन साहेबराव देसले हे गस्तीवर असताना निदर्शनास आला.

देसले यांनी अधिकची कुमक बोलावून छापा टाकला. घटनास्थळी पायात घुंगरू व तोडके कपडे घालून सहा मुली डान्स करत होत्या तर या डान्सपार्टीचा मद्यधुंद अवस्थेत मनमुराद आनंद लुटणाऱ्या नाशिकमधील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संशयित लोकांमध्ये कथित डॉ. राहूल मगनलाल जैन (३३,रा. बागमार भवन, नाशिक), अनिल लक्ष्मण बर्गे (४२. रा. जुने नाशिक), लक्ष्मण राजेंद्र पवार (३१, पेठरोड नाशिक) प्रकाश पांडुरंग गवळी (३३, पंचवटी ), अर्जुन दत्तात्रय कवडे (२३,मखमलाबाद नाशिक), बासू मोहन नाईक (४४, खडकाळी, जुने नाशिक), आकाश राजेंद्र गायकवाड (१९, रा. पाथर्डीफाटा, नाशिक), हर्षद विजयकुमार गोठी (२७, वासननगर, नाशिक), चेतन दत्तात्रय कवरे (३०, मखमलाबाद), काशी अनंतलाल पंडीत (३५, शिंगाडा तलाव, नाशिक) या दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक एम. वाय. मांडवे करीत आहेत.

Igatpuri resort dance party 10 people arrested fake journalist barbala

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.