अपघात हा घात असतो तो कधीही होवू शकतो.असाच दुर्दैवी प्रकार आज इगतपुरी येथे घडला आहे. ट्रीप साठी बाहेर गेलेल्या एका परिवावर मोठे संकट आले होते. यातून चौघे तर वाचले मात्र एका बालिकेचा मृत्यू झाला आहे. यामध्ये फार परिश्रम आणि कठीण काम करत ६०० मीटर दरीतून या सर्वाना वाचविले आहे.
इगतपुरी येथे उंटदरी घाट येथे ट्रीप साठी कटाकीया कुटुंब इगतपुरीला गेले होये.तेव्हा त्यांनी उंटदरीजवळ कार पार्क केली होती. तर सेल्फी काढत हे पुन्हा परतणार होते. सर्व झाले आणि सर्व गाडीत बसले, मात्र काही विसरले नाही तर नाही ना म्हणून हरिष कटाकीया गाडीतून उतरलेल होते. तेव्हा त्यांचा लहान मुलगा त्याने न कळत गाडीचा रिव्हर्स गिअर टाकला होता.
मात्र जेव्हा हरीश आले तेव्हा त्यांनी गाडी सुरु केली आणि घात झाला.गाडी रेस करताच गाडी मागच्या दिशेने गेली आणि खोल घाटात पडली.मग काय हे सर्व काही सेकंदात घडले होते.मात्र काही पर्यटकांना हे लक्षात आले होते. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
तेव्हा पोलीस पोहचण्याअगोदरच महामार्ग सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दरीत दोराच्या सहाय्याने उतरून जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे माती आणि दगड ओले असल्याने क्रेनला दोर बांधून दरीत उतरुन पथकाने जखमींना बाहेर काढले आहे. मात्र आयात दुर्दैव असे की वैष्णवी वय १५ ही मृत झाली आहे.
आडगाव नाका परिसरातील कोणार्क नगर येथील हॉटेल जत्राजवळ नाशिक येथील रहिवासी हरिष गोपाल कटाकीया (वय ३९ वर्ष) आणि पत्नी गीता हरिष कटाकीया (वय ३४), मुलगी अदिती (वय ९ वर्ष), मुलगा रुद्रा (वय ७ वर्ष) आणि मुलगी वैष्णवी हे पाचही जण आय टेन (एम.एच.१५ डीएम- २५५१) हे सर्व ट्रीप साठी गेले होते.हरिष, त्यांची पत्नी गीता, मुलगी अदिती, मुलगा रूद्रा हे गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.