ylliX - Online Advertising Network

इगतपुरीत बाफना ऑईल मिलला आग, लाखोंचे नुकसान

इगतपुरी : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवाबाजार पेठेतील जुनी बाफना ऑईल मिलला गुरूवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आग लागली होती. या भीषण आगीत बाफना ऑईल मिल पूर्णपणे जळुन खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदरची आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत सुदैवाने जिवीत हानी झालेली नाही. igatpuri bafna oil mill fire loss million rupees

इगतपुरीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवाबाजार पेठेतील जुनी बाफना ऑईल मिलला भीषण आग लागली. या आगीने काही वेळातच मोठे रूप धारण केले. आगीचे मोठ मोठे गोळे बाहेर पडत असल्याचे दिशून आले.  तात्काळ येथील मालक बाफना यांना समजताच आरडा ओरडा केला.

यावेळी आजू बाजूचे नागरिक गोळा होऊन लगेच इगतपुरी नगरपरिषद व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

या अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्न करून दोन तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.

आगीत बाफना ऑईल मिलमध्ये असलेले तेलाचे डबे व किराणा सामान पुर्णपणे जळुन खाक झाल्याने लाखो रुपयांचे रुपयांचे नुकसान झाले आहे.

igatpuri bafna oil mill fire loss million rupees
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.