ylliX - Online Advertising Network

भाजपने विचारले तर नाशिकमधून निवडणूक – नारायण राणे

नाशिक :नाशिकमधून विधानपरिषद निवडणूक लढवणार ही चर्चा फक्त वृत्तपत्रातच आहे. जर, मला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचारणा झाली. तर, मी विचार करून निर्णय घेईन, असे देखील नारायण राणे म्हणाले आहेत. नाशिक येथील कोकण उत्सवासाठी राणे नाशिकला आले होते.

नारायण राणे यांनी विद्यमान सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की मागील तीन वर्षात कोकणचा हवा तसा  विकास झाला नाही. त्यामुळे मला येथील प्रश्न सोडवता यावे म्हणून नवीन पक्ष काढावा लागला आहे.काँग्रेस पक्ष सोडून बाहेर पडल्यावर भाजपशी त्यांनी सुत जुळवले मात्र कोकण विकासाच्या मुद्यावर सरकारवर टीका केली आहे.सोबत त्यांनी सरकाला अनेक सल्ले दिले आहेत. ते म्हणतात की  तसेच कर्जमाफी देऊन शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत,  पिकांना योग्य भाव देणे गरजेचे आहे. त्यांतर  शेतकरी आत्महत्या थांबतील, असा सल्ला देखील राणे यांनी यावेळी दिला आहे. राणे यांनी  पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेमुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला आहे, २२ वर्ष शिवसेना मुंबईत सत्तेवर आहे. मात्र कोणतेही काम शिवसेनेला जमले नाही. घरांच्या किंमती कोट्यवधी रु. झाल्या आहे.त्यामुळे मराठी माणसाला मुंबई सोडावी लागत आहे.

कोकण महोत्सवासाठी नाशकात आलेले नारायण राणे यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला आहे. महोत्सवाची पाहणी करत नारायण राणे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.