ylliX - Online Advertising Network

हवाई दलाचे विमान कोसळल्यामुळे दीड एकर द्राक्षबागेचे नुकसान

लासलगाव(वार्ताहर)समीर पठाण

भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 हे लढाऊ विमान आज (दि. 27) सकाळी साडेदहाला शिरवाडे वणी (निफाड) येथे कोसळल्यामुळे एक ते दीड एकर द्राक्षबागे चे नुकसान झाले आहे. IAF Sukhoil Mig Crashed farmers loss one half acre grapesfield

शिरवाडे वणी ता निफाड शिवारातील सुखदेव बाबुराव निफाडे यांचे गट नंबर 282 मधील नविन दिड एकर द्राक्षबाग व योगेश ढोमसे यांचे गट नंबर 284 मधील एक एकर द्राक्षबाग विमानच्या झालेल्या स्फोटच्या आगीमुळे नुकसान झाले आहे.

इथे वाचा सविस्तर बातमी : हवाईदलाचे सुखोई मिग लढाऊ विमान शेतात कोसळले

IAF Sukhoil Mig Crashed farmers loss one half acre grapesfield, नाशिक एचएएल सुखोई मिग 30 एमकेआय पिंपळगाव बसवंत शेतकरी द्राक्षबाग नुकसान निफाड

सुखदेव निफाडे यांचा मुलगा शाम निफाडे व एक मजुर त्या द्राक्षबागेत काम करत असतांना विमानाचा काही भाग शाम निफाडे यांच्या अंगावर पडल्याने त्यांना दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ पिंपळगाव बसवंतच्या राधाकृष्ण हास्पीटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले आहे. IAF Sukhoil Mig Crashed farmers loss one half acre grapesfield

विमान ज्या ठिकाणी पडले त्या जागेपासुन अगदी कमी अंतरावर 220 केव्हीचे लाईट गेली असल्याने या लाईनवरही विमानाचे काही भाग पडल्याने दोन ठिकाणी विजेच्या तारा तुटण्याच्या अवस्थेत झाल्या आहे. या तारा तुटल्या असत्या तर मोठा अनर्थ घडला असता.

घटनेच्या ठिकाणापासुन अगदी शंभर फुटाच्या आसपास एक वस्ती होती. सकाळी अकराची वेळ असल्याने घरातील सर्व महिला व पुरूष घरातच होत्या. सुखदेव निफाडे व योगेश निफाडे यांचे अंदाजे पंचवीस लाखाचे नुकसान झाल्याचे समजते.

लासलगावसह नाशिक आणि महाराष्ट्रातील आजचे कांदा भाव 27 जून 2018

(सर्व छायाचित्र समीर पठाण लासलगाव)

IAF Sukhoil Mig Crashed farmers loss one half acre grapesfield
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.