ylliX - Online Advertising Network

दिंडोरी भाजपा मध्ये होणार बंड ; चर्चेला गिरीश महाजन नकोच – खासदार हरीश्चंद्र चव्हाण

दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपमध्ये होणार बंडखोरी

तीनदा निवडणून आलेले दिंडोरी येथील  भाजपा खासदार यांचा तिकीट पक्षाने नाकरले यामुळे ते आता बंडाच्या भूमिकेत गेले आहे. त्यांनी मतदार संघात तालुकावार बैठका घ्यायला सुरुवात केली असून नंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार असे त्यांनी सांगितले आहे. तर भाजप ने माझी उमेदवारी का नाकारली या प्रश्नाचे उत्तर द्यावे, गिरीश महाजन हे जे दावे माध्यमांत करत आहेत, असे कोणते सर्वे केले गेले असून, पाच टक्के तरी मतदारांनी सांगावे की मी उमेदवार नको म्हणून असे बोलत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली असून, रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री यांच्या सोबत मी चर्चा करेल मात्र तेथे गिरीश महाजन नको अशी कठोर भूमिका चव्हाण यांनी घेतली आहे. त्यामुळे दिंडोरी जो भाजपाचा मतदार संघ होता तेथे बंडाचे चित्र उभे राहिले आहे.girish mahajan

हरीश्चंद्र चव्हाण यांनी सुरगाणा येथे कार्यकर्ता मेळावा घेतला आहे. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. जेव्ह्या दोन निवडणुकात नरेद्र मोदी यांची लाट नव्हती तेव्हा मी निवडणून आलो आहे. तर ज्या उमेदवाराला भाजपने आता तिकीट दिले आहे, त्याचा मी विक्रमी मतांनी पराभव केला असून माझे तिकीट का नाकारले हे मात्र अनजुही समजू शकले नाही. जेव्हा मी निवडणू आलो तेव्हा कोठे होती लाट असे ही चव्हाण यांनी म्हटले आहे.

गिरीश महाजन हे जरी संकट मोचन वाटत असले तरीही मुख्यमंत्री यांचे संकट कधी होतील हे सांगता येत नाही. कोणता सर्वे आणि कधी सर्वे केला ज्यामध्ये मी निवडणूनयेणार नाही असे महाजन सांगत आहेत. माझे तिकीट का नाकारले हा प्रश्न आहे. कोरड्या विहिरीत उडी मारण्या ऐवजी मी आगोदर माझ्या मतदार संघातील कायकर्ते काय म्हणतात ते पाहतो, अजून मी बंडखोरी केली नसून चर्चा करेल मात्र चर्चेला गिरीश माहाजन नकोच अशी भूमिका चव्हाण यांनी घेतली आहे.

आदिवासी भागात कधी दौरा केला आहे का ? त्यान येथील प्रश्न माहित आहेत का ? तर आयात उमेदवार देताना कोणते निकष लावले हे सुद्धा कळत नाही असे म्हणत चव्हाण यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. चव्हाण हे मालेगाव येथून एकदा आणि दिंडोरी येथून दोनदा भाजपा खासदार आहेत. चव्हाण यांनी बंड केले तर मोठा फटका भाजपाला बसणार आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.