ylliX - Online Advertising Network

वडाळागाव : पत्नीचा रागात चाकू भोसकून खून

नाशिक रोड परिसरातील असलेल्या  वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या तिच्या पतीने चाकूने भोसकून खून झाला आहे. सविस्तर वृत्त असे, फुले नगर येथे राहत असलेल्या सुरेखा पहाडे यांचे त्यांच्या पतीसोबत घरगुती जोरदार  भांडण झाले होते. संशयित पती  जिवाजी पहाडे यांनी रागाच्या भरात चाकूने पत्नीला भोसकले होते. यामध्ये सुरेखा फार मोठ्या प्रमाणात  जखमी झाल्या होत्या आणि रक्तस्त्राव सुद्धा झाला होता. जखमी अवस्थेत सुरेखा यांना दिराने  जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना सुरेखा यांचा मृत्यू झाला आहे. संशयित जीवाजी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.