पंचवटी : पेट्रोल टाकून महिलेला जाळले; जाळणारा देखील भाजला

पंचवटी परिसरात जळीतकांड घडलं आहे. टकले नगर येथील हरिसिद्धी इमारतीमध्ये एका पुरुषाने महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. husband friend burns wife dead panchavati nashik crime news

या घटनेमध्ये महिला रेखा मोरे (वय 32) गंभीर भाजल्यानंतर तिला खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. तिला जाळणारा इसम पतीचा मित्र आणि तिचा मानलेला भाऊ रवींद्र भामरे देखील थोडा जळाला असून त्याने विषारी औषध घेतल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो गंभीररीत्या भाजला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, कृष्ण नगर येथे हरिसिद्धी इमारतीत बाळू मोरे पत्नी आणि मुलगी या कुटूंबासह भाडेतत्वावर गेल्या काही महिन्यांपासून राहत होते. मोरे खाजगी नोकरी करतात तर रेखा गृहिणी होत्या.

त्यांच्यासोबत गणेशवाडी येथे मिसळपावची गाडी लावणारा रवींद्र भामरे हा रेखा यांचा मानलेला भाऊ या कुटुंबासोबत एकत्र राहत होता. या एकत्र राहण्यावरून शनिवारी (दि. 30) रोजी रवींद्र आणि रेखा यांच्यात भांडण झाले. रविवारी सकाळी मोरे कामावर असताना पुन्हा सकाळी वाद झाला. वादानंतर चिडलेल्या भामरेने बेडरूम मध्ये रेखा यमन अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. आणि तो इमारतीच्या टेरेसवर जाऊन थांबला. अंघोळीला गेलेल्या मुलगी सायली हिला आईचा ओरडण्याचा आवाज आल्याने ती घराबाहेर पळाली. घरातून मोठा धूर येत असल्याचे दिसताच परिसरसतील नागरिकांनी अग्निशमन दलास कळवले. आग विझवल्यानंतर महिला गंभीर भाजल्याचे कळले. खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. भामरे यानेही विषारी औषध सेवन केल्यानेजळीतकांड घडले त्या घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे.

पंचवटी पोलिसात ठार मारल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिकचा तपास करण्यात येत आहे.

(छायाचित्र प्रातिनिधिक)

husband friend burns wife dead panchavati nashik crime news
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.