विवाहिता तरुणीची सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

नाशिक : नाशिक-पुणे रोडवरील शिंदे गावात राहणार्‍या २२ वर्षीय विवाहितेने ३ दिवसांपूर्वी गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Husband arrested persuade wife suicide nashik road shinde gaon

या मृत विवाहितेचे नाव हर्षदा अरविंद शहाणे (वय २२, रा. ९ भक्तीसंकुल अपार्टमेंट, शिंदे गाव,पुणे रोड, नाशिक) आहे. या प्रकरणी हर्षदावर अंत्यविधी करत असताना तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारीदेखील झाली होती.

Recent News : महिला सरपंचाचा केला विनयभंग, गुन्हा दाखल

हरिष भरत लोळगे (मयत हर्षदाचा भाऊ) याने दिलेल्या तक्रारीनुसार, हर्षदाचा पती संशयित अरविंद मधुकर शहाणे याने मे २०१५ ते २५ मे २०१८ पर्यंत पत्नी हर्षदा हिच्याशी किरकोळ कारणातून नेहमी वाद होत आणि भांडणे होत होती. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. Husband arrested persuade wife suicide nashik road shinde gaon

पतीच्या या नेहमीच्या जाचाला कंटाळून हर्षदा हिने घरी असताना स्वत:ला गळफास लाऊन आत्महत्या केली. नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिच्या पतीविरुद्ध पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Husband arrested persuade wife suicide nashik road shinde gaon
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.