नेचर क्लबच्या पक्ष्यांच्या शाळेत शेकडो पक्ष्यांचा किलबिलाट

नेचर क्लबच्या पक्ष्यांच्या शाळेत शेकडो पक्ष्यांचा किलबिलाट

  • टाकाऊतून टिकाऊ चा प्रयोग / तीस जातींच्या पक्ष्यांनी घेतला प्रवेश

नाशिक- नेचर क्लब ऑफ नाशिक तर्फे पक्ष्यांची शाळा हा उपक्रम यावर्षी देखील राबविला महाराष्ट्रात असा प्रयोग प्रथमच नेचर क्लब नी सुरु केला आहे. नाशिकच्या संत गाडगे महाराज धर्मशाळेत यावर्षी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांना दाणा पाणीची सोय व्हावी,विद्यार्थांना पक्ष्यांची ओळख व्हावी,नदी काठावरील पक्ष्यांची निरीक्षणे करून पक्षी संवर्धनासाठी काय करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी पक्ष्यांची शाळा हा उपक्रम राबविला जात असतो.

या ठिकाणी संस्थेचे कार्यकर्ते गेल्या तीन महिन्यापासून शाळा चालवीत असून; आत्ता पर्यंत या शाळेत तीस जातीच्या शेकडो पक्ष्यांनी किलबिलाट केला आहे. टाकाऊ तून टिकाऊ चा प्रयोग हे या शाळेचे प्रमुख उदिष्ट म्हणावे लागेल. प्लास्टिक बाटल्यातून पक्ष्यांना पाणी आणि खाद्य ठेवण्यासाठी उपकरणे संस्थेने स्वतः बनविली या बाटल्या वसई किल्ल्या वरील श्रमदान मोहीम राबविताना तेथे पर्यटकांनी फेकलेल्या बाटल्या गोळा करून त्याचा उपयोग केला, तसेच योगेश कापसे,संपदा पाटील  यांनी देखील बाटल्या उपलब्ध करून दिल्या गाडीचे खराब टायर चा उपयोग करून या परिसरात पाच तळी बनविण्यात आली.

नारळाच्या करवंटी तून खाद्य देणारे उपकरणे बनविण्यात आली तेलाच्या कॅन चा उपयोग करून फूडर बनविण्यात आले तसेच या परिसरात लाकडाची दहा घरटी देखील लावण्यात आली. या परिसरात बगळे,नाईट हेरॉन,कावळे,वटवाघळे, पान कावळे आदींच्या कॉलनी असल्याने त्यांचा अभ्यास यावेळी करण्यात आला, या पक्ष्यांच्या शाळेला रशियन नागरिकांनी भेट देवून कार्याचे कौतुक देखील केले. गाडगे महाराज धर्मशाळेचे अध्यक्ष उत्तमराव देशमुख यांनी देखील या शाळेस भेट दिली. चिमण्या,बुलबुल,सनबर्ड,pond हेरॉन, नाईट हेरॉन, कार्मोरंट, साळुंक्या,दयाळ,शिंपी,SWIPT,धोबी,कावळे,भारद्वाज,कोकिळा, तांबट,आदींसह अनेक पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यास  मिळत आहे. नाशिकचे प्रसिद्ध चित्रकार योगेश रोकडे,महेश जगताप,अनुपमा चव्हाण,व प्रीतम महाजन या कलावंतांनी शाळेत सुंदर चित्रे देखील साकारली आहे.  हि शाळा पाच जून जागतिक पर्यावरण दिन  रोजी सर्व नाशिकरांना बघता येणार असून याठिकाणी छायाचित्र प्रदर्शन देखील भरविले जाणार असून;  टाकाऊतून टिकाऊ फुडर कसे बनवायचे याची प्रात्यक्षिका सह माहिती दिली जाणार आहे.

गाडगे महाराज धर्मशाळेचे व्यवस्थापक कुणाल देशमुख यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असून शाळा चालविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा आनंद बोरा,भीमराव राजोळे,अप्पा कोरडे,सागर बनकर,आकाश जाधव,आशिष बनकर,धनंजय बागड,अभिषेक रहाळकर,रोहित नाईक,समीर ठाकूर आदी परिश्रम घेत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.