2014 ची गोष्ट, एक शिपिंग कॉर्पोरेशनचा मालक खूप तणावात होता. ३५० कोटी रुपयेच कर्ज होते. एक खाजगी बँक परतफेडीचा साठी तगादा लावून बसलेली. त्या मालकाने जवळपास सर्व बँक के पैश्यासाठी प्रयत्न करू लागला. पण कोणी ताकास तुर नाही लागून दिलं. प्रत्येक बँक नकार घंटा दाखवत होते. मग एके दिवशी एका शुभचिंतकाने त्यांना येस बँकचे राना कपूर यांची गाठ घ्यायला सांगितली. – How Yes Bank Failed येस बँक का बुडाली?
निराश मनाने त्याने राणा कपूर कडे appointment मागितली. बाकीचे बँकर त्यांना टाळत असताना, राणाने ने 2 दिवसा मध्ये त्यांना appointment लगेच दिली. मात्र रात्रीच्या जेवणाला कपूरने त्या शिपिंग कॉर्पोरेशन मालकाला त्याचा घरी म्हणजे वरळीला समुद्र महाल मध्ये बोलावले. दोन तास जेवणाचा कार्यक्रम झाला पण राणा आणि त्या मालक मध्ये याविषयी एक शब्द बोलणे झाला नाही.
जाताना हा विषय काढणार त्याच वेळी राणा कपूर बोलले की ३५० कोटी हवेत पण मी ५०० कोटी देतो आणि repayment (परतफेड) 12 वर्ष कालावधी. पण एक अट आहे. Upfront charges म्हणजे सुरूवातील 10% काढून घेणार. ही अट विचित्र असली तरी त्या शिपिंग कॉर्पोरेशन मालकाला इतर बँकांच्या तंगड्या पासून सुटकारा मिळणार होता. त्याने तात्काळ होकार दिला. 10% upfront म्हणजे या आगाऊ पैशांमुळे येस बँकची दोन वर्ष balance sheet म्हणजे ताळेबंद जमाखर्च चांगलाच दिसला.
राणा कपूर हे अती आत्मविश्वास होते की दूरदृष्टीची कमतरता हे भविष्य ठरवेल. मुकेश अंबानी antila या बिल्डिंग शेजारी त्याने एक मोठे घर घेतले आणि मुंबईच्या सर्वात महाग भागात येस बँकचे ऑफिस ठरले. हे सर्व घडले 2014 लाच. तब्बल 128 कोटी रुपये देऊन ही जागा त्याने विकत घेतली.
राणा कपूर आता मुंबईत भारतच्या आर्थिक क्षेत्रात चांगलच नाव कमवत होते. जिकडे भारतीय बँकर हे पारंपरिक दृष्टीकोनाने बँक चालवात होते, तिथेच राणा कपूर हे आक्रमकपणे नाव कमवत होते. राणा आता अनेक उद्योगपतींना आणि इतर मान्यवर लोकांना पार्टी द्यायला प्रसिद्ध होते. रेस कोर्सवर राणा यांचे नाव होते. अनेक बँकेचे प्रतिस्पर्धी त्यांना अनेक पडत्या आणि डुबत्या उद्योगाचे शेवटचा आधार म्हणून डिचवत असत.
पण हे सर्व करत होते त्या लोकांच्या ठेवी वर, समभागांच्या मूल्यावर. याचा राणाला विसर पडला. रघुराम राजन यांनी हातात सूत्रे घेतले आणि सर्व बँकांना NPA दाखवणे सक्तीचे ठरले. सर्व बँकांची तारांबळ उडाली. जी गोष्ट भारताच्या आर्थिक क्षेत्रात अनेक तज्ञ लोक दबक्या आवाजात बोलत होते. ती गोष्ट आता स्पष्ट होते होती. अनेक बँका स्वतःचे NPA चलाखीने लपवत होते. ती बाब बाहेर यायला चालू झाली. (राणा कपूर हे आपल्या दर्यादिलासाठी प्रसिद्ध होते तसेच शिवीगाळसाठी पण प्रसिद्ध होते. डेक्कन क्रोनिकल, विजय मल्ल्याकडून त्यांनी येस बँकची कर्ज परतफेड करून दाखवली होती ही बाब पण विसरून चालणार नाही.) अन नंतर रिजर्व बँक ऑफ इंडिया ने त्यांना सक्तीने घरी पाठवले. त्यांचे येस बँक मधील हिस्सेदारी कमी करायल लावली. तसे राणा कपूर यांचे मित्र पण दुरावले. How Yes Bank Failed

राणा कपूरचा बँकिंग क्षेत्रातला हा अचानक झालेला नव्हता. कॉर्पोरेट बँकर म्हणून त्यांनी बँक ऑफ अमेरिका आणि ANZ grindlay सारख्या प्रतिष्ठित संस्थांबरोबर बरोबर कर्ज वाटप आणि investment banker म्हणून काम केलं. नंतर abn amro bank चे अशोक कपूर आणि डच बँकचे हरकिरत सिंह यांनी मिळून राबो इंडिया फायनान्सची 1998 साली स्थापन केली. मूलतः त्यांना बँक स्थापन करायची होती. अतिशय लाघवी स्वभाव आणि कैक वर्षांचा उत्कृष्ट बँकिंगचा अनुभव असलेल्या या कपूर द्व्यी वर सरकारने पण कृपा दृष्टी दाखविली. आणि त्याकाळात बँक चालवण्याचा परवाना त्यांना मिळाला.
अशा रीतीने येस बँक ची स्थापना झाली. हरकिरत सिंग यांनी स्वतःचा दुसरा मार्ग स्वीकारला आणि अशोक कपूर यांचा मुंबईवर झालेल्या २००८ मध्ये अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. नंतर फक्त राणा कपूर यांचा येस बँक वर दबदबा निर्माण झाला. येस बँक ही पुढची hdfc bank हे त्यांचे नेहमी वक्तव्य असे. मात्र आपल्या कर्जासाठी आलेल्या ग्राहकाला कधी विमुक्त हाताने जाऊ द्यायचे नाही हा राणा कपूरचा फाजील विश्वास अखेर नडला आणि भारतातील खाजगी बँक मधील चौथ्या क्रमांकाची बँकेला अखेरची घरघर पुढे लागली.
रघुराम राजन यांनी चालाखीने NPA विषयी बँकांना ताकीद दिली. पण राजन यांना सरकारची नाराजी भोवली आणि त्यांना एक्स्टेन्शन मिळाले नाही. आता येस बँकने नवीन शक्कल लावली. त्यांचे NPA खूप प्रचंड होते. अशा वेळी एखादे कर्ज अनुत्पादित ( NPA) कर्जामध्ये वळीत होत असेल तेव्हा ते दुसऱ्या एका मोठ्या बँकेला विकत घ्यायला लावायचे पण त्यात त्याच किंमतीत ते कर्ज परत नंतर विकत घ्यायची अट पण असायची. त्यामुळे रिझर्व बँक ऑफ इंडिया चा येस बँक वर जास्त लक्ष गेले. हळू हळू येस बँक मधील सर्व प्रकार लक्षात आल्यावर अनेक नियमाकडे बोट दाखवून येस बँक ची नाकेबंदी केली. How Yes Bank Failed
इतर बँक पेक्षा 3% जास्त दर लावणाऱ्या येस बँकच्या कपूरला केवळ मोठ्या meetings मध्ये रस होता. प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये त्याला रस नव्हता हे त्यांचे पैसे बुडवणाऱ्या लोकांनी हेरले.
अशोक कपूर यांचा मृत्यू झाल्यावर अशोक कपूर यांच्या पत्नीने त्यांची मुलगी शागुन हिला बोर्ड ऑफ डायरेक्टर वर बसवण्याचा प्रयत्न केला पण राणा कपूर यावेळी आडवे पडले. प्रकरण कोर्टात गेले आणि मग कोर्टामार्फत शागून यांना बोर्ड वर बसवले गेले.
रिझर्व बँक ऑफ इंडिया नवनवीन शक्कल लढवून येस बँक ची सारे घोटाळे बाहेर काढत होते.
Cnbc वर एकदा मुलाखती मध्ये राणा यांना प्रश्न विचारला की जेंव्हा भारतातल्या सर्व बँक npa जेंव्हा दुहेरी अंकात दाखवत आहे तेंव्हा येस बँक फक्त 1% कसे काय आणले? विशेष म्हणजे भारतीय उद्योगांना कर्ज जवळपास सर्वात जास्त म्हणजे 65% एवढा वाटा येस बँक कर्जाचा होता. तेव्हा कपूर यांनी ते सारे यश बँकेच्या अधिकाऱ्यांचे आहे असे सांगितले.
त्यानंतरच्या वर्षांत नवीन चूक उघडकीस आली. आयएल अँड एफएस, अनिल अंबानी गट, सीजी पॉवर, कॉक्स अँड किंग्ज, कॅफे कॉफी डे, एस्सेल ग्रुप, एस्सार पॉवर, वरदराज सिमेंट, रेडियस डेव्हलपर्स आणि मंत्री ग्रुप यांचा समावेश असलेल्या काही मोठ्या डिफॉल्टर्समध्ये बँकेचा निधी अडकला आहे.
आणि तो दिवस उजाडला जेव्हा DHFL सारे प्रताप बाहेर पडले. येस बँक ने DHFL ला खूप पैसा दिलेला. त्यामुळे अनेक वित्तीय संस्थानी येस बँक समभाग घ्यायला सुररूवात केली. अनेक मोठ्या वित्तीय संस्थांनी समभाग विकायला चालू केले आणि साम्य लोकांनी घ्यायला. तरी पण hdfc bank ५.८ कोटी आणि एलआयसी कडे २० कोटी समभाग आहेत. How Yes Bank Failed