ylliX - Online Advertising Network

solar eclipse 1995 नंतर सूर्यग्रहण कधी कुठे कसे

चला साक्षीदार बनूया, शतकातील सर्वात मोठ्या सूर्यग्रहणाचे

चालू वर्ष 2020 मधलं पहिलं सूर्यग्रहण रविवारी 21 जून रोजी होत आहे. पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये चंद्र आल्याने चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्यामुळे सूर्य किरण पृथ्वीच्या त्या भागात पोहचू शकत नाही. त्यालाच ग्रहण लागलं असं म्हटलं जातं. हे शतकामधलं सर्वात मोठ सूर्यग्रहण आहे. solar eclipse

देशात कसं सूर्यग्रहण दिसणार ?

चालू वर्षातल हे एकमेव कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. संपूर्ण भारतातून हे ग्रहण खग्रास पद्धतीने दिसणार नाही. देशाच्या काही भागातून हे सूर्यग्रहण कंकणाकृती पद्धतीने दिसेल. पैकी मसुरी, टोहान, चमोली, कुरुक्षेत्र, डेहराडून या भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. त्याचप्रमाणे देशाच्या वेगवेगळ्या भागातून सूर्य कमी-अधिक प्रमाणात झाकल्याचे दिसेल. राजधानी दिल्लीत सूर्यग्रहणावेळी सूर्य ९५ टक्के झाकल्याचे दिसेल.

सूर्यग्रहणाची वेळ

मुंबईत सकाळी १० वाजून १ मिनिटांनी या ग्रहणाला सुरुवात होईल. तर सकाळी 11.28 ही ग्रहणाची मध्य वेळ आहे. दुपारी २.२०  ला ग्रहण संपून जाईल.
ग्रहणाचा सूतक काळ हा २० जून रोजी रात्री ९ वाजून १६ मिनिटांपासून सुरू होणार आहे.

सूर्यग्रहण कसे पाहावे ?

ग्रहणाविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. मात्र ही वैज्ञानिक घटना असून त्याचा आनंद सगळ्यांनी घेतला पाहिजे असं आवाहन वैज्ञानिक कायम करत असतात.

ग्रहण प्रत्येकाने पाहिलं पाहिजे मात्र त्यासाठी काही काळजी घेणे गरजेचं आहे. साध्या डोळयांनी ग्रहण पाहणं हे धोक्याचं असून त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकतो.

ग्रहण पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारचे गॉगल्स मिळतात त्याचा वापर करणं हे सगळ्यात उत्तम आहे.  त्याचबरोबर खास प्रकारच्या काचाही उपलब्ध असतात त्यातूनही हे ग्रहण पाहता येईल. स्थानिक विज्ञान शिक्षकांना विचारूनही काही गोष्टी करता येऊ शकतात.

याशिवाय सूर्यग्रहण पाहताना दुर्बिण, टेलिस्कोप, ऑप्टिकल कॅमेराचा वापर करुन पहावे.

सूर्यग्रहणाला कुठून सुरुवात होणार

सूर्यग्रहण हे आफ्रिकेतील कांगो येथून सुरू होणार आहे आणि त्यानंतर इथिओपिया, येमेन, ओमान, सौदी अरेबिया, हिंद महासागर, पाकिस्तान नंतर भारतातील राजस्थानमध्ये प्रवेश करेल. भारतानंतर तिबेट, चीन, तैवानच्या दिशेने प्रशांत महासागराच्या मध्यभागी सूर्यग्रहण समाप्त होईल.

अनेकांना १९९५ची आठवण करुन देणार

हे सूर्यग्रहण २५ वर्षांपूर्वी झालेल्या २४ ऑक्टोबर १९९५ रोजीच्या ग्रहणाची आठवण करुन देईल. त्या दिवशी झालेल्या सूर्यग्रहणाने अनेक भागांत काहीसा अंधार झाला होता. त्याच प्रमाणे यावेळी सुद्धा अंधार होण्याची शक्यता आहे. solar eclipse

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.