ylliX - Online Advertising Network

नाशिककरांच्या घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत दुप्पटीने वाढ

नाशिककरांच्या घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत दुप्पटीने वाढ

नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेने साल २०१८-१९ या वर्षापासून घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत दुप्पट भरीव करवाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांवर कराचा बोजा वाढणार आहे. यावेळी स्थायी समितीच्या सभेत प्रस्तावित करवाढीला भाजपा सदस्यांनी जोरदार समर्थन केले आहे. तर शिवसेना आणि कॉंग्रेस यांनी मात्र तीव्र विरोध केला.

सदरची करवाढ पुढील वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. गेल्या २२ वर्षांपासून मालमत्तेच्या सर्वसाधारण करामध्ये २८ वर्षांपासून तर स्वच्छता, जललाभ, पथकर, मनपा शिक्षण कर यामध्ये वाढच झालेली नाही. त्यानुसार घरपट्टीत १८ टक्के करवाढ प्रशासनाने प्रस्तावित केली असल्याचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी स्पष्ट केले. नाशिकचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने महापालिकेला करसुधारणा करणे गरजेचे आहे.

नगरसेवक निधी उपलब्ध करुन देण्यासाठीही उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे करवाढ अपरिहार्य असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले. घरपट्टीबरोबरच पाणीपट्टीत सरासरी ४० टक्के करवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. सदर वाढ ही पंचवार्षिक असून सन २०१९-२० पासून प्रतिवर्षी त्यात एक रुपयांनी वाढ केली जाणार आहे. त्यामुळे पाच वर्षात दुप्पट करवाढ होणार आहे.

घरगुती पाणीवापरासाठी सध्या प्रति हजारी ५ रुपये, बिगर घरगुतीसाठी २२ रूपये आणि आणि व्यावसायिक वापरासाठी २७ रुपये दर आहे. नवीन प्रस्तावानुसार, सन २०१८-१९ मध्ये घरगुती दरात ७ रुपये, बिगर घरगुतीसाठी २५ तर व्यावसायिकसाठी ३० रुपये दर असणार आहे. याशिवाय, घरगुती पाणीवापरासाठी घेण्यात येणाºया नळजोडणी शुल्कातही दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे तर बिगर घरगुती व वाणिज्य वापरासाठी सरासरी ३५ ते ४० टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.