ylliX - Online Advertising Network

नराधम वॉचमन ने केले अंध मुलीचे लैंगिक शोषण, ऑडियो रेकोर्डिंग ने प्रकरण बाहेर

संतापजनक प्रकार सातपूर परीसरात घडला आहे. एका 14 वर्षीय दिव्यांग मुलीवर 52 वर्षीय शिपायाने लैंगिक अत्याचार केला आहे.  शासकीय अंध शाळेत केअर टेकरने मुलांना दारूच्या नशेत मारहाण केल्याची घटना नाशिकमध्ये ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी चॉकलेटचे आमिष दाखवून वसतीगृहामध्ये शिपाई पदावर कार्यरत असलेले बाळू धनवटे हे पीडित मुलीवर वस्तीगृहाच्याच शौचालयात वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले आहेत. हे सर्व  मागील चार महिन्यांपासून हा  सुरु होते.hostel watchman try to rape miner girl and sexually harassed nab nashik satpur

या नराधम वॉचमन ने मुलीला धमकावले होते,  कोणाकडे वाच्यता केल्यास चाकूने मारून असा दम भरला होता. मात्र सर्व प्रकार असह्य झाला आणि कंटाळून पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या काही मैत्रिणींना सांगत ऑडिओ रेकॉर्ड करून एका शिक्षिकेला सांगितला आणि शाळेसह हॉस्टेलमध्ये एकच खळबळ उडाली.hostel watchman try to rape miner girl and sexually harassed nab nashik satpur

मुलीने सातपूर येथे फिर्याद दिली असून  शिपाई बाळू धनवटेवर बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून  त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या मुलींच्या वसतीगृहात सर्व महिला मुली असून फक्त हाच एक पुरुष होता जो रखवालदार होता. समाजातील या विशेष मुली सर्वसामान्य मुलींप्रमाणेच जगण्याचा, समाजात वावरण्याचा प्रयत्न करत असतानाच बाळू धनवटे सारखे नराधम त्यांना लक्ष्य करत आहेत. या घटनेमुळे वसतीगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सातपूर पोलिस मात्र या प्रकरणावर न थांबता इतर मुलींची चौकशी करणार असून असा प्रकार अजून कोणासोबत झाला नाही ना हे तपासून पाहत आहे.

hostel watchman try to rape miner girl and sexually harassed nab nashik satpur
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.