hookah party nashik ‘इलाका’ मधील हुक्का पार्टीवर कारवाई:मद्यधुंद तरुण-तरुणी ताब्यात

नाशिक – गंगापूर धरणाजवळ असलेल्या दोन खासगी फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. त्याठिकाणी हुक्का पार्टी करणाऱ्या 30 पेक्षा अधिक तरुण व तरुणींना पोलीस अधीक्षकांनी ताब्यात घेतले आहे. या हुक्का पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर झाल्याचाही पोलिसांना संशय आहे.खासगी फार्म हाऊसवर सुरू असलेल्या हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा टाकला

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची धडक कारवाई –

नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये आता कोरोना बाधितांच्या आकडा वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. गर्दी न करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वच आस्थापना, हॉटेल, मॉल ,चित्रपटगृहांना देण्यात आले आहेत. तरीही अनेक नागरिक या आदेशाचे पालन करत नाहीत. हॉटेल आणि मॉल लवकर बंद होत असल्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या पार्ट्या किंवा हुक्का पार्ट्या होऊ शकत नाही. याचाच फायदा घेऊन काही नागरिकांनी आपले फार्म हाऊस हुक्का पार्ट्यांसारख्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी अशा ठिकाणांवर धडक कारवाया सुरू केल्या आहेत.hookah party nashik

पोलिसांनी मद्यधुंत तरुण-तरुणींना ताब्यात घेतले
hookah party nashik

पोलिसांनी मद्यधुंत तरुण-तरुणींना ताब्यात घेतले

बंद दरवाजाआड सुरू होती हाय प्रोफाईल हुक्का पार्टी –

नाशिकच्या गंगापूर धरणाजवळील दोन खासगी फार्म हाऊसवर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी शनिवारी मध्यरात्री छापा टाकला. या ठिकाणी सुरू असलेल्या हुक्का पार्टीमध्ये दारू तसेच अमली पदार्थांचे सेवन झाल्याचे समोर आले आहे. बंद दरवाजाआड एक हायप्रोफाईल हुक्का पार्टी सुरू होती. पोलिसांनी छापा टाकून 30 पेक्षा अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असताना, अशा पार्ट्या कशा सुरू होतात आणि त्यांचे आश्रयदाते कोण आहेत? हा सर्वात मोठा प्रश्न या निमित्ताने आता समोर आला आहे.

गंगापूर धरणालगत उभारलेल्या इलाका नावाच्या फार्महाऊस, रेस्टॉरंटमधील हुक्का पार्टीवर पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी कारवाई केली. यात रेस्टॉरंट चालक गौरव मालेसह इतर १७ जणांविरोधात कारवाई केली. तर इतर संशयिताविरोधात जमावबंदी, आपत्ती निवारण कायद्यानुसार कारवाई केली.

गंगापूर धरणालगत अनेक फार्महाऊस, हॉटेल, रेस्तराँट उभारले आहेत. येथे नेहमीच मद्यपी, हुक्का पिणारे तरुण, तरुणीची वर्दळ बघायला मिळते. त्यामुळे स्थानिकांना याचा त्रास होत असतो. मात्र ग्रामीण पोलिसांकडून ठोस कारवाई होत नव्हती. शनिवारी रात्री अधीक्षक पाटील यांनी पथकासह इलाका रेस्टॉरंटवर कारवाई केली. या ठिकाणी सोशल डिस्टन्स, मास्क न लावता पार्टी करणारे वावरत होते. या सर्वांविरोधात तालूका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

  •  सिगारेट, तंबाखु जन्य पदार्थ असा सुमारे २ लाखाचे साहित्य जप्त केले. शहर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु असतांनाही गर्दी करणाऱ्या सुमारे ३८ तरुण-तरुणीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ५१ (ब) नुसार गुन्हे दाखल केले.
  • कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवे उच्चांक गाठत असताना सावरगाव शिवारात हॉटेल गंमत-जंमत पिकनिग स्पॉटमागे हॉटेल इलाका रिसॉर्ट आहे. तेथे लोकांची गर्दी असून अवैधपणे हुक्का पार्टी सुरु असल्याची माहीती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाल्याने त्यांनी स्वतः पथकासह रिसॉर्टवर छापा टाकून कारवाई केली.hookah party nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.