CBS : कारने दिली झाडाला धडक, एकाचा मृत्यू

नाशिक : नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या हुतात्मा स्मारकाशेजारील झाडाला भरधाव वेगाने कारने धडक दिली. या अपघातामध्ये कारचालक जागीच ठार झाला असून कारमधील इतर चौघे गंभीर जखमी आहेत. रविवारच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास सदरचा अपघात झाला आहे.Honda amaze car accident one died spot other injured 

या अपघाताची अधिक माहिती अशी की, होंडा अमेझ कार (एमएच १५ ईपी१९२६) अशोकस्तंभाकडून सीबीएसच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. कारचालक गिरीश दीपक भरीतकर(२२),रामेश्‍वर रमेश जाधव (१६), नीलेश सुनील बडगुजर (२५) आणि आणखीन दोघे मित्र असे पाचही कारमध्ये होते.

यावेळी हुतात्मा स्मारकाजवळ कारचालक गिरीश भरीतकर याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. यामध्ये कारची चालक बाजू पूर्णपणे चेपली गेली. Honda amaze car accident one died spot other injured

कारचालक गिरीश भरीतकरला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील चौघेजण जखमी झाले आहेत.

याप्रकरणी विनोद राजेंद्र खैरे यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Honda amaze car accident one died spot other injured

हे सुद्धा वाचा…

* नाशिकमध्ये पांडवलेण्यावरून पाय घसरून युवकाचा मृत्यू

* त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ रस्त्यावर आजपासून वाहतुकीत बदल, स्मार्ट रस्त्याचे काम सुरू

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.