मुबंई कडे जाणाऱ्या बरेली 02062 या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याची भयानक घटना घडली आहे. आज सकाळी नांदगांव रेल्वे स्टेशन जवळ ही घडली आहे. सुदैव की या अपघतात कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातामुळे मुंबई कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून मोठा अपघात टळला आहे.
ही हॉलिडे एक्स्प्रेस बरेलीहून मुंबईला निघाली होती. याचवेळी नांदगाव स्थानकावर दोन डबे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात घडला आहे. या रेल्वेच्या चाकाला जबरदस्त तडे गेल्याने चाक अर्धे तुटले आहे. यामुळे डबे घसरले होते. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली असून अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. चाक तुटले तेेव्हा गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळून गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला आहे. प्रशासनाने अपघाताची दखल घेत आपत्कालीन टीमच्या सहाय्याने घसरलेले रेल्वेचे डबे हटविले आहेत. मात्र उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्वच लोकल खोळंबल्या आहेत. तर मोठ्या पल्ल्याच्या कामायनी, झेलम, संचखंड, हातिया एक्स्प्रेस रखडल्या आहेत. सोबतच भुसावळ-मुंबई रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे. मात्र याचा मार्गावर अनेकदा रेल्वेचे असे अपघात होंताना दिसून येत आहे. जर ही गाडी वेगात असती तर अनर्थ झाला असता मात्र सुदैवाने रेल्वेचा वेग कमी होता म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे. हे अपघात का होतात ? रेल्वे प्रशासन याकडे गंभीर नजरेने पाहत नाही का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.