ylliX - Online Advertising Network

शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीतील वाढीचा केंद्राचा निर्णय ऐतिहासिक – मुख्यमंत्री

नागपूर : शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यासाठी केंद्र शासनाने आज विविध शेतमालांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ जाहीर केली आहे. केंद्र शासनाचा आजचा हा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.historic decision Center’s decision increase minimum support price field

विधानभवन येथे प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांची ही बऱ्याच वर्षांपासूनची मागणी होती. केंद्र शासनाने अर्थसंकल्पात तशी घोषणाही केली होती. त्या आश्वासनाची आज पूर्तता झाली आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. पण तरीही केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता तशी तयारी दर्शविली आहे.

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे. सिंचन, सूक्ष्मसिंचन, फूडपार्क्सची योजना, युरियासंदर्भातील निर्णय, किसान संपदा योजना अशा अनेक निर्णयांचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यादृष्टीने अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकरी हिताचे सर्वाधिक निर्णय घेणारे हे सरकार आहे, असे ते म्हणाले.

शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या दृष्टीने आज विविध शेतमालांसाठी जाहीर झालेल्या किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) निर्णयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले.

historic decision Center’s decision increase minimum support price field

Share this with your friends and family

You May Also Like

2 thoughts on “शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीतील वाढीचा केंद्राचा निर्णय ऐतिहासिक – मुख्यमंत्री

  1. म्हणजे सरकारच्या म्हणण्यानुसार कांद्याला पन्नास रुपये क्विंटलला खर्च येतो काढणीपर्यंत म्हणून मागच्या वर्षी दोनशे रुपये अनुदान दिले मग यांनीच कांदा काढून दाखवा ना तेवढ्या खर्चात आम्हीपण त्यांच्या म्हणण्यानुसार कांदे पिकून मग तो दोनशे रुपये क्विंटल कांदा गेला तरी परवडेल आम्हाला तेव्हा फडणवीसांनी लवकरात लवकर डेमो प्लॉट अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवावा डेमो प्लॉटचा पत्ता लवकर द्यावा म्हणजे सर्व शेतकरी येऊन कमीत कमी बघतील तरी शेती कशी करावी फडणवीस साहेब आम्हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा धन्यवाद.

  2. म्हणजे सरकारच्या म्हणण्यानुसार कांद्याला क्विंटलला पन्नास रुपये खर्च येतो म्हणून मागच्या वर्षी कांदा विकला जातो पन्नास रुपये गेला होता तर सरकारने दोनशे रुपये अनुदान दिले एवढे मोठे अनुदान दिल्याबद्दल सर्व शेतकरी सरकारच्या आभारी आहोत तेव्हा फडणवीस साहेब आपण आणि आपल्या पत्नी सौ अमृता फडणवीस दोघांनी कृपया एखादा प्लॉट करून दाखवा आम्हाला म्हणजे सर्व शेतकरी आपल्या कडून प्रेरणा घेतील म्हणजे सर्व शेतकरी आपल्याकडे येतील आणि आपल्यासारखीच कमी खर्चात शेती कशी करता येते शिकतील तेव्हा कृपया पत्ता सांगावा आपण एवढा महान कार्य केल्या बद्दल आपले आभारी आहोत धन्यवाद फडणवीस साहेब मला वाटत नाही आपले सरकार परत येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.