ylliX - Online Advertising Network

दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला, हेल्मेट म्हणून बचावले दुचाकीस्वार

बिबट्याचा या प्रकारचा दुसरा हल्ला helmet saves mans life Leopold attack Nashik.

नाशिक : पाथर्डी-वडनेर रस्त्यावरुन रात्रीच्या सुमारास नाशिकरोडकडून दुचाकीने जात असलेला दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ल्यासाठी घेतलेल्या झेपमुळे जखमी झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार बचावला आहे.

helmet saves mans life Leopold attack Nashik
बिबट्याचा हल्ला

पिंपळगाव खांबच्या शिवारात रोपवाटिकेच्या परिसरातून बिबट्याने अचानकपणे रस्त्याच्या दिशेला झेप घेतली होती, त्याचवेळी दुचाकीवरुन (एम.एच.०२ सीयू ४७७१) आयुर्वेद चिकित्सक संजीव कुमावत प्रवास करत होते बिबट्या इतक्या जवळ अचानक आल्याने ते घाबरले आणि धावत्या गाडीवरून खाली पडले होते. मात्र त्यावेळी त्यांनी सुदैवाने हेल्मेट परिधान केलेले असल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला नाही. तर बिबट्या सुद्धा थोडा घाबरला आणि त्या ठिकाणाहून तो पुन्हा पळून गेला. बिबट्याची रस्त्यावरुन झेप घेण्याची वेळ आणि कुमावत तेथून मार्गस्थ होण्याची वेळ एक झाल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले होते.अशी  माहिती वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी दिली आहे.घटनेची माहिती समजताच वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार हे वनरक्षकांसोबत तातडीने पिंपळगाव खांब परिसरात दाखल झाले होते.

https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.