नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी: जुने नाशकात पाणीच पाणी (व्हिडियो) 

नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी
नाशिक : शहरात अतिवृष्टी झाली असून, 92 मि.मी. पावसाची जिल्हा प्रशासनाकडे नोंद झाली आहे. शहरासह इंदिरानगर, जुने नाशिक, पंचवटी, अशोका मार्ग, सिडको, वडाळा, सातपूर, नाशिकरोड, पाथर्डी आदी उपनगरीय भागात मुसळधार पाऊस झाला आहे. शहरात मुसळधार पावसाने दैना उडवलीे आहे.त्यामुळे आज  सराफ बाजारातील दुकाने पाण्यात गेले आहेत. तर मोठ्या प्रमाणावर  रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद पूर्ण बंद होती. तर शहरातील अनेक भागात असलेल्या  विजपुरवठाही खंडित झाला.

for video click here : Rain in Nashik.

पावसामुळे नाशिक जिल्हा न्यायालयात झाड कोसळून एक लहान मुलगा जखमी झाला.वणी, वडाळीभोई, मनमाड, निफाड, सटाणासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. नाशिक परिसरातही पाऊस झाला आहे.निफाड आणि मनमाड येथेही जोरदार पाऊस पडला.मनमाड शहरात आज दुपारी सलग चौथ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली.सखल भागात पाणी साचलं असून अनेक वाहनंही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. फक्त दुचाकीच नाही तर काही चारचाकी वाहनंही वाहून गेली आहेत. तसेच या पावसाचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.सराफ बाजारात अनेक वाहने वाहून गेली असून दुकानांमध्येही पाणी घुसलं आहे. दीड तासाच्या मुसळधार पावसानेच नाशिक तुंबलं असून शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे. यामुळे महापालिकेचा मान्सूनपूर्व कामाचा दावा फोल ठरला आहे.

नाशिक शहरात परिसरात बुधवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सुमारे एक तास पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह पाउस झाला. यावेळी बहुतांश सर्व उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला. सर्व प्रमुख रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. शहरातील अनेक भागात आणि रहिवासी सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सोबत गोदावरी नदीलगत असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले . शहरातील मुख्य बाजार पेठेसह सराफ बाजारातील दुकानांमध्ये पाणी शिरले . त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्या सत्र न्यायालयाच्या परिसरात असलेले झाड पडले असून यात लहान मुलगा जखमी झाला आहे. नाशिक जिल्ह्यातही सटाणा, वणी, मनमाड, निफाड , कळवण  परिसरात पाऊस झाला आहे.या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात आता शेतीच्या  मशागतीची कामे वेगात सुरूi झाली आहेत.शेतीसाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.