भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात विषप्राशन केलेल्या धर्मा पाटील यांचा नुकताच मुत्यु झाला समृद्धी असो की शेतकरी संप याप्रमाणे याचेही राजकीय भांडवल होईल मात्र यापुढेही अशा अनेक धर्मा पाटलांचा बळी सुरूच राहील कारण हे अच्चे दिन देणारे माझं सरकार आहे याचं विषयावर खान्देशातील ऐका शेतकऱ्याने व्यक्त केलेल्या भावना फक्त Exclusive nashikonweb.com वर
हाई शे मन सरकार !
राम राम मंडळी बर शे का ?
आज मारुतीना पारवर भलती गर्दी व्हती,
पण समदासना तोंडमा एकचं चर्चा धुळ्याना धर्मा पाटीलनी कोणी काय सांगे कोणी काय सांगे पण मना मनमा इचार उना या समदार सांगि त राहण्यात पण येसनाभी कितला धर्मा पाटील बसेल व्हतीन येसनी जमीन जायेल नही पन कर्ज त baattहा वर हुई ना आते खुशी खुशी मा बोली राहनात पण कदीन आपला बी धर्मा पाटिल हुई अस तेसले मनमा वाटी रायन हुई का?
तलाठी सर्कल तहसीलदारकडे जा नही त कलेरकटरकडे शेतकरिले कुत्र ईचारत नही, आते मंत्रालयमा तरी निवाडा हुई अस धर्मा पाटिल ले वाटणं पन वहण उलट येसंपेक्षा त्या बेहत्तर जीव गया बिचाराणा आते ती जमिनना कितलाबी कोटी भेटनात तरी धर्मा पाटीलना जीव परत येणार नही,
कोणी मोर्चा काढतीन कोणी आंदोलन करतीन पण जीव गया तो गया,
हाई चालूच र्हाई जवलोग मन सरकार शे तवलोग ,
शेतकरी ना हातमा फक्त ईतलच शे जे हुई राहयन ते दखतावहान बस.,
चांगला दिन येले त म्हंमतास ना भो.
One thought on “सरकारवर खानदेशातून जोरदार टीका- हाई शे मन सरकार !”