ylliX - Online Advertising Network

नववर्ष स्वागत यात्रेतून मतदान, पाणी आणि राष्ट्रीय एकात्मकता याबाबत होणार जनजागृती

गुढीपाडव्या निमित्त  नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन

नाशिक,दि.२९ मार्च :- अत्रेयनंदन बहुद्देशीय कलाक्रीडासांस्कृतिक व सामाजिक संस्था कामटवाडे व नववर्ष स्वागत यात्रा समिती नवीन नाशिक यांच्यावतीने गुढीपाडव्या निमित्त काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या वर्षी १०० टक्के मतदानपाणी बचतएकात्मिकता याबाबत चित्ररथ तयार करून जनजागृतीकरून  नववर्षाचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्षा प्रा. वैशाली शिंदेकार्याध्यक्ष राजेंद्र फडकोषाध्यक्ष श्री. योगेश मांडेसचिव राजेश मालपुरे यांनी दिली आहे.

नवीन नाशिक परिसरात तीन वर्षापासून गुडीपाडव्या निमित्त सर्व समाजाचे संघटन व समाज प्रबोधन तसेच नवीन नाशिक परिसरात सांस्कृतिक अभिसरण व्हावे या हेतूने नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या यात्रेत सामाजिक संस्थासामाजिक मंडळेविविध शैक्षणिक संस्था यांचा सहभाग असणार असतो. या शोभायात्रेत पारंपारिक वेषात ढोलपथकझांजपथकध्वजपथकलेझीम तसेच यंदा या स्वागत यात्रेतून नागरिकांनी १०० टक्के मतदान करणे,  पाण्याची बचत व राष्ट्रीय एकात्मतता याबाबत चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

नवीन नाशिक नववर्ष स्वागत यात्रा समिती तर्फे दोन शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून या  तिन शोभा यात्रा गुडीपाडव्या निमित्त शनिवार दि ०६ एप्रिल २०१९ या दिवशी सकाळी ०६.३० वा. नवीन नाशिक परिसरातून वावरेनगर चौक ते माउली लॉन्स व धन्वंतरी कॉलेज ते वावरेनगर चौक ते माउली लॉन्स आणि पवननगर मारुती मंदिर ते माऊली लॉन्स या तिन वेगवेगळ्या ठिकाणावरून सुरु होऊन डी.जी.पी. नगर २ माउली लॉन्स शेजारी ठाणे जनता सहकारी बँकसमोर कामटवाडे येथे सकाळी ८.०० वा. एकत्र येणार आहे. या शोभा यात्रेत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्षा प्रा. वैशाली शिंदेकार्याध्यक्ष राजेंद्र फड यांनी केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.