Grocery stores किराणा दुकाने आणि इतर सर्व प्रमुख बाजारपेठा ८ दिवस बंद

शहरातील जुने नाशिक, दहीपूल, कानडे मारुती लेन, दुधबाजार, , एमजी रोड मेनरोड, शालिमार, शिवाजी रोड, रविवार कारंजा, कापड बाजार, परिसरासह प्रमुख बाजारपेठा रविवार (दि. २१) पासून पुढील रविवार (दि. २८) स्वयंस्फूर्तीने बंद राहणार आहेत. सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी तसेच हॉकर्स असोसिएशनच्या शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे . बेशिस्त गर्दी करणारे नागरिक यांच्यावर लगाम ठेवायला बेशिस्त व्यापारी वर्गाने हा निर्णय घेतला आहे. मात्र याला कोणताही कायदेशीर आधार नाही.Grocery stores


कोरोनाचा प्रादुर्भाव शहरातील पंचवटी, जुने नाशिक, द्वारका, अशोक स्तंभ, रविवार कारंजा आदी भागांत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून जरी बंदबाबत निर्णय घेतला जात नसला, तरी नागरिकांसह सर्वपक्षीय नगरसेवक व विविध संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला आहे.

यात खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा, जुने नाशिक परिसर पुढील आठ दिवस पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहेत.
शनिवारी बैठकीस भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, माजी महापौर विनायक पांडे, राजेंद्र बागूल, यतिन वाघ, यांच्यासह मेनरोडचे व्यापारी आणि हॉकर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, विक्रेते उपस्थित होते.

प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, किराणा व्यापारी असोसिएशन यांनी सांगितले आहे. कि आमच्या किराणा व्यापारी असोासिएशननेदेखील या संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे रविवार कारंजा, जुने नाशिक, अशोक स्तंभ भागातील किराणा दुकानेही आठ दिवस बंद राहणार आहेत.
सराफांची वेगळी भूमिका :
मुख्य बाजार बंद राहणार आहे, मात्र यांचा एक भाग असलेला सराफ बाजार मात्र बंद राहणार नाही. त्यामुळे हा बाजार नेहमी प्रमाणे सुरु राहणार आहे.Grocery stores

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.