Greenfield Devpt Smart City नाशिक व मखमलाबादच्या शेतकऱ्यांचे स्मार्ट सिटी विरोधात शरद पवार यांना निवेदन

नाशिक : महानगर पालिका क्षेत्रामध्ये नाशिक स्मार्ट सिटी कंपनी मार्फत हरितक्षेत्र विकसित करण्यासाठी नाशिक व मखमलाबाद शिवारामध्ये सुमारे ७५० एकर शेत जमिनीवर नगररचना योजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यास स्थानिक शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला आहे. तरीही मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय करणारी योजना राबवण्यासाठी कारवाई सुरु केल्याचा आरोप करत याविषयीचे निवेदन शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देत प्रकल्पाला टाळे लावण्याची मागणी केली आहे. Greenfield Devpt Smart City

या परिसरातील सर्व जमिनी या शेतीसाठी वापरात असून या मध्ये द्राक्ष, पेरू, डाळिंब यांच्या फळबागांसह मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात येत आहे. या पुढेही आम्हाला शेती व्यवसाय चालू ठेवायचा असल्याने या नगररचना योजनेस विरोध केलेला असतांनाही नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने मनमानी पद्धतीने शेतकऱ्यावर अन्यायकारक योजना राबवण्याची कारवाई सुरु ठेवली आहे.

नगररचना योजना शहराच्या ज्या भागात कमी किंमतीच्या पडीत जमिनी आहेत अश्या ठिकाणी राबवण्याचा विचार करणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर करतांना केंद्र शासनाने फक्त ३१५ एकर क्षेत्रात हरित क्षेत्र विकास योजना अंतर्भुत असतांना चुकीच्या व अन्यायकारक पद्धतीने ७५४ एकर क्षेत्रावर ही योजना राबविण्याचा घाट घातला जात आहे.

या नगररचना योजनेमुळे आमचे शेतीचे क्षेत्र हे ४५ टक्क्यांनी कमी होणार असल्याचे सांगत आज मितीस पाऊस, गारपीट या नैसर्गिक संकटांना कसे तरी तोंड देत आहोत व उदार निर्वाह करीत असल्याचे शेतकऱ्यांनी पवार यांना सांगितले. या नंतर हे मानव निर्मित संकट आमच्यावर येऊ पाहत आहे.

त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांची सुरु असलेली शेती संपूर्ण कुटुंबाचे उदरनिर्वाहासाठी पूर्ववत कायम ठेवणे आवश्यक आहे. असे असताना सदर प्रस्तावित नगररचना योजना रद्द करण्यात यावी या मागणीचे निवेदन शरद पवार यांना देण्यात आले आहे.

याबाबत लवकरच नगरविकास मंत्री, अधिकारी यांच्याबरोबर शेतकऱ्यांची बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढू असे आश्वासन शरद पवार यांनी दिले. या प्रसंगी गोकुळ पिंगळे, सुरेश अण्णा पाटील, पंडित तिडके, अरुण महाले, शरद फडोळ, नाना तिडके, संजय पिंगळे, वासुदेव तिडके, दिनेश बच्छाव, गणपत फडोळ यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. Greenfield Devpt Smart City

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.