द्राक्षांच्या मागणीत झाली घट ,बाजारभावामुळे कर्ज फेडण्यास अडचणी ,द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ .
द्राक्षांची मुख्य बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शेतक-यांना दरवर्षी वेगवेगळ्या संकटांना समोरे जावे लागत आहे .इतर पिके जसे कांदा यातून कोणताही नफा निघाला नसताना , उतम पिक असलेल्या शेतक-यांची एकमेव आशा असणारे द्राक्षांच्या बाजार भावात होणा-या घसरणीतून निर्यातक्षम द्राक्षदेखील सुटू शकली नाहीत. तर हे कमी म्हणून व्यापारी पलायनाने यात वाढ झाली आहे .द्राक्षांचे बाजार भाव बघता द्राक्षपिकावर झालेला खर्च फिटने आवघड झाल्याने उत्पादक शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
मागच्या पाच वर्षांपूर्वी निर्यातक्षम द्राक्ष पिकविणारा शेतकरी हा मोठा बागाईतदार म्हणून बघितला जायचा.आत जवळपास बहुतेक शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक बनला असला तरी त्यांच्या अडचणीत देखील वाढ झाली .यंदा चांगला पाउस झाला द्राक्षांचे पिक भरघोस आले .निर्यात हि चांगली झाली. ६० ते ७० रुपये किलोचा भाव मिळत असलेल्या द्राक्षांना १५ ते २० रुपये किलोची करतात मागणी ,काही व्यापारी जास्त रक्कम देतो मात्र पैसे घेण्यासाठी थांबावे लागले असे सांगत द्राक्ष घेऊन लाखांचा गंडा देत पळ काढण्याच्या घटना घडतात .
द्राक्ष निर्यात करतांना निर्यातदार द्राक्षबागेतून ३० ते ३५ टक्केच माल खरेदी करतो .त्यामुळे उरलेला माल पडेल त्या किमतीत विकावा लागतो .सध्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षबागा या व्यापा-यांची वाट पहात आहे .जवळपास ४० ते ४५ टक्के बागांना भावही मिळत नाही आणि व्यापरी मिळत नाही अशी परिस्थितीत झाल्याने ,घेतलेले बँकांचे व सावकारी कर्ज कसे फेडावे या विवंचनेने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
मागील काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा कधी थंडी तर कधी उष्णता ,गारपीट,वादळवारे याचा परिणाम द्राक्ष बागावर होत असतो .या संकटातून द्राक्षबागा वाचविल्या तर बाजारभाव मिळत नाही .त्यातच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तापमान ४० अंशाच्या वर गेल्याने त्याचा द्राक्षघडांवर परिणाम होऊ लागला आहे .वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची पातळीदेखील झपाट्याने खाली येत असून द्राक्षबागांसह शेतात असणारी उभी पिके वाचविण्यासाठी शेतक-यांची धडपड सुरु आहे .
सध्याच्या परिस्थितीत एक किलो द्राक्ष पिकविण्यासाठी सरासरी २० ते २५ रुपये खर्च येत असतो .मात्र बाजारभावसुध्दा तेवढाच मिळत असल्याने उत्पादन खर्च फिटत नाही .त्यामुळे चोहोबाजूने शेतकरी भरडला जाऊ लागला आहे .बरेच शेतकरी या वर्षी सोसायटीचे बँकांचे कर्ज फेडू शकणार नसल्याचे दिसत आहे .
व्यापा-यांच्या म्हणण्यानुसार भारतातील सर्वच बाजारपेठात आंबा,केळी आदी फळांचे मोठ्या प्रमाणावर आगमन झाल्याने बाजारभावात घसरण झाली आहे . द्राक्ष उत्पादन क्षेत्रात दरवर्षी होणारी वाढ लक्षात घेऊन यावर सरकारने संशोधन करून उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला तरच या पुढील काळात द्राक्ष पंढरीतील शेतकरी हा जिवंत राहील अन्यथा विदर्भ ,मराठ्वाद्यासारखी परिस्थितीत होण्यास वेळ लागणार नाही .