डिजीटल पेमेंट आणि एनपीएसबाबत कार्यशाळा संपन्न
नाशिक : शासकिय कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यवहारांमध्ये कॅशलेस पर्यायांचा वापर करुन बँकाद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या डिजीटल पेमेंट प्रणालींचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी विलास गांगुर्डे यांनी केले.
श्री.आमडे यांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार तसेच बँक स्टेटमेंट, डिपॉझिट, कर्ज आदींसाठी वापरात असणाऱ्या प्रणालीची माहिती दिली. यावेळी एसबीआय बडी, समाधान, एसबीआय क्विक आदी ॲपची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.
राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना (एनपीएस) पंधरवडा 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान साजरा होत असून या अनुषंगाने विविध विभागांच्या आहरण व संवितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी डिजीटल पेमेंट व एनपीएसबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहायक संचालक स्वरांजली पिंगळे,लेखाधिकारी वनिता देवरे, स्टेट बॅक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी संदिप आमडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कोषागारे विभागाचे प्रतिक बगावे यांनी 2015 नंतर शासन सेवेत आलेल्या अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी 2015 पासून नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंमलात आल्याचे सांगून त्याचे वैशिष्ट्ये व वापराबाबत सादरीकरण केले.