ylliX - Online Advertising Network

gover nashik नाशिकमध्ये गोवरचे संशयित रुग्ण

मुंबई, मालेगावपाठोपाठ नाशिक शहरातही आता गोवरचा धोका वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरात केलेल्या तपासणीत गोवरची लक्षणे असलेली चार संशयित बालके आढळून आली आहेत. वैद्यकीय विभागाने या चारही संशयित बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबईस्थित हाफकिन लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवली आहेत. या चार रुग्णांच्या अहवालानंतर ते बाधित असल्याचे समोर आल्यास शहरात तपासणी मोहीम राबवली जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.gover nashik

मुंबई, मालेगाव पाठोपाठ आता नाशिक शहरात देखील गोवरचे चार संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये काही दिवसांपूर्वी गोवरचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे शहराच्या वेशीवर आलेल्या या आजाराने आता शहरात प्रवेश केल्याचा संशय निर्माण झाला आहे. या संशयित चार बालकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

गोवर हा विषाणूपासून पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार सामान्यत: लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. काहीवेळा प्रौढांनाही हा आजार होऊ शकतो. गोवर आजार एकदा झाल्यास पुन्हा तो त्या व्यक्तीला होत नाही. मुंबईत गोवरमुळे आतापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबईनंतर मालेगावमध्येही गोवरची साथ दिसून येत आहे. पाठोपाठ आता नाशिकमध्येही गोवरचा धोका वाढला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील काही भागांमध्ये केलेल्या तपासणीत गोवरची लक्षणे असलेले चार संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी मुंबईतल्या हाफकिन लॅबमध्ये पाठविण्यात आले असून, त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

After Mumbai, Malegaon, the risk of measles is also likely to increase in Nashik city. Four suspected children with symptoms of measles have been found in the city by the Medical Department of the Municipal Corporation. The medical department has sent the blood samples of all the four suspected children to Mumbai-based Hafkin Lab for testing. Medical Superintendent Dr. Dr. Bapusaheb Nagargoje said.gover nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.