ylliX - Online Advertising Network

धक्कादायक : महिलांनो तरणतलावात होतेय तुमचे चित्रीकरण!! राहा दक्ष

नाशिक : सध्या चालू असलेला कडक उन्हाळा, सुट्ट्यांचा मोसम यामुळे शहरातील महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या जलतरण तलावांमध्ये महिलांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. सातपूरच्या तरणतलावात या कालावधीत परिसरातील काही गुंड प्रवृत्तीचे लोक मोबाईलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नगरसेविका वत्सला खैरे यांनी केला आहे. काल झालेल्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत वत्सला खैरे यांनी हा आरोप करत तक्रार करूनही दाखल घेतली जात नसल्याचा आरोपही केला आहे. यावेळी स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी पाचही जलतरण तलाव परिसरात सभासदांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश न देता सुरक्षाही वाढविण्याचे आदेश दिले.

शहरात महापालिकेच्या मालकीचे पाच जलतरण तलाव आहेत. त्यातला एक खाजगी ठेकेदाराला चालविण्यास दिला आहे. त्र्यंबक रोड वरील सावरकर जलतरण तलावात महिलांसाठी वेगळी व्यवस्था आहे. मात्र नाशिकरोड, सिडको व सातपूर येथील तरण तलावात महिलांसाठी विहेश वेळ देऊन त्यावेळात केवळ महिलांनाच प्रवेश दिला जातो.

शहरातील सर्व तरण तलावांमध्ये महापालिकेचे सुरक्षारक्षक तैनात असूनही असा प्रकार घडतो, त्यामुळे सुरक्षारक्षकांची तातडीने बैठक बोलाविण्याची मागणी शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष वत्सला खैरे यांनी केली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.