कौतुकास्पद नाशिक पोलिस :गुन्ह्यातील हस्तगत असा ५२ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

घरफोडी चोरी , सोनसाखळी चोरी अश्या अनेक पद्धतीने चोर नागरिकांच्या मालावर डल्ला मारतात. अनेकदा अनेक वर्ष हा गेलेला मुद्देमाल नागरिकांना परत मिळत नाही. मात्र नाशिक पोलिसांनी चोरांना पकडून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशाच सर्व वस्तू पोलिसांनी आज रावसाहेब थोरात सभागृहात जाहीर कार्यक्रमात नागरिकांना परत केला आहे.

nashik police returning muddemal

यामध्ये शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या गुन्ह्यात चोरटयांकडून हस्तगत करण्यात आलेला 52 लाख 46 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याकडून फिर्यादीना परत देण्यात आला आहे.

नाशिक शहर पोलिसातील सर्व पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा १ आणि २ चे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी कारवाई केली. यामध्ये सदरची मालमत्ता हस्तगत केली होती. यामध्ये २२ फिर्यादींचे एकूण १३ लाख 6 हजार रु. किंमतीचे सोन्याचे दागिने. तर २९ वाहनचोरीतील सायकल आणि चारचाकी ज्यांची किंमत ३० लाख ९० हजार रुपये तर १३ फिर्यादींचे मोबाईल फोन ज्यांची किंमत आहे ७७ हजार.

nashik police returning muddemal

या शिवाय इतर चोरीमध्ये टिव्ही, सिलेंडर, मेडिकल ऑक्सिजन 10 सिलेंडर असा एकूण 7 लाख ७३ हजार ६००चा मुद्देमाल यांचा समावेश यावेळी होता. सदरच्या एकूण हस्तगत केलेल्या मालमत्तेची किंमत 52 लाख 46 हजार 600 रु. इतकी आहे. ही पकडलेला  मुद्देमाल पोलिसांनी परत सर्व नागरिकांना केली आहे.

तसेच विशेष म्हणजे फिर्यादी सुनिता सुराणा यांचे गळ्यातील मंगळ सूत्र जानेवारी महिन्यात दोन इसमांनी ओढून नेले होते.यातील एका आरोपीला सुराणा यांनी धाडसाने पकडले होते. त्या आरोपी कडून पोलिसांना ९ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उकल करता आली होती. त्यामुळे पोलिसांनी सुनिता सुराणा यांचा विशेष सत्कार केला होता. सोबतच्यांचे १७ ग्रॅम वजनाचे ३५ हजार किंमतीचे मंगळसूत्र परत करण्यात आले आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी सुद्धा पोलिसांनी पकडला आहे.

nashik police returning muddemal

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.