ylliX - Online Advertising Network

Good news Nashik पहिल्या फेरीत फ्रंट लाईन आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

नाशिक दिनांक 15 जानेवारी 2021 : कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी अंतिम उपाय म्हणून कोविड लसीकरणाची मोहिमेला आजपासून (16 जानेवारी) सुरूवात होणार असून या मोहिमेत कोरेाना काळात अविरतपणे फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या 19 हजार 548 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कोविड लसीकरणाच्या अनुषंगाने पूर्व तयारीची जिल्हा टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते.Good news Nashik
जिल्ह्यातून 36 हजार 178 हेल्थ केअर वर्करची नोंदणी : – 
जिल्हाधिकारी  म्हणाले, कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, पुणे कंपनीने तयार केलेल्या ‘कोविडशिल्ड’ या लसीचे जिल्ह्याला 43 हजार 440 डोसेजेस प्राप्त झाली असून या लसीकरणाचा आजपासून (16 जानेवारी) प्रत्यक्ष प्रारंभ होत आहे. कोविड लसीकरणाच्या पहिल्या फेरीत लसीकरणासाठी जिल्ह्यातून 36 हजार 178 हेल्थ केअर वर्करची नोंदणी करण्यात आली आहे. यातील एका व्यक्तिला दोन डोस याप्रमाणे पहिल्या फेरीत 19 हजार 548 हेल्थ केअर वर्करला लसीकरण करण्यात येणार आहे.
या लसीकरणाअंतर्गत गर्भवती महिला व स्तनदा माता यांना लसीकरण करण्यात येणार नाही. तसेच लसीकरणासाठी जिल्ह्यात 13 केंद्र निश्चित करण्यात आली असून या एका केंद्रावर एका दिवसात 1 हजार 300 डोसेजेस देण्यात येणार असून एका आठवड्यात चार दिवस लसीकरण करण्यात येणार आहे. यानुसार लसीकरणाच्या पहिल्या फेरीची प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी साधारण एक ते दीड महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे, असे  मांढरे यांनी सांगितले आहे.
लसीकरणाच्या प्रक्रीये दरम्यान लसीकरणानंतर अतिदक्षतेची परिस्थिती निर्माण झाल्यास पूर्व प्रत्येक केंद्रावर 102 व 108 या अम्बुलन्सची सेवा 24 तासांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अनुषंगानेच लसीकरणानंतर लाभार्थ्याला परिक्षण कालावधी दरम्यान काही विपरीत परिणाम जाणवल्यास पुढील उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालय, संदर्भसेवा रूग्णालय, एनडीएमव्हीपी मेडिकल कॉलेज नाशिक व एसएमबीटी धामणगाव या रूग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे.
त्याप्रमाणे जिल्हा व तालुकापातळीवर लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. लसीकरणाच्या प्रत्येक केंद्रावर सुरू असणाऱ्या लसीकरण मोहिमेची माहिती देण्यासाठी एक पर्यवेक्षक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी आणि लसीकरण प्रक्रीयेत सहभागी असलेल्या सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी व्यवस्थीतरित्या पार पाडावी, अशा सूचनाही यावेळी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
लसीकरणाच्या पहिल्या फेरीत ग्रामीण भागातील सहा केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सदर केंद्रावर आवश्यकत्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून लसीकरणाच्या लाभार्थ्यांना लसीकरणा विषयीची माहिती देणारे फलक संबंधित केंद्रावर लावण्यात आले आहेत. तसेच आजपासून सुरू होणारी लसीकरणाची मोहिम यशस्वी करण्यासाठी  आवश्यक सर्व नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बैठकीत दिली.
लसीकरण केंद्रावर लसीकरणा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच अनधिकृत व्यक्ती लसीकरण केंद्रात प्रवेश करणार नाही यासाठी पोलिस यंत्रणेमार्फत आवश्यक सर्व खबरदारी घेण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी बैठकीत सांगितले.
1. जिल्हा रुग्णालय, नाशिक
2. सामान्य रुग्णालय, मालेगाव
3. उपजिल्हा रुग्णालय,कळवण
4. उपजिल्हा रुग्णालय, निफाड
5. उपजिल्हा रुग्णालय, चांदवड
6. उपजिल्हा रुग्णालय, येवला
7. इंदिरा गांधी हॉस्पिटल, नाशिक
8. शहरी आरोग्य केंद्र, नवीन बिटको, नाशिक
9. शहरी आरोग्य केंद्र, जे. डी. सी बिटको, नाशिक
10.  शहरी आरोग्य केंद्र, कॅम्प वॉर्ड मालेगाव
11. शहरी आरोग्य केंद्र, निमा 1 मालेगाव
12. शहरी आरोग्य केंद्र, रमजानपुरा मालेगाव
13. शहरी आरोग्य केंद्र सोयगाव, मालेगावGood news Nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.