कॉँग्रेस प्रवक्ता हेमलता पाटील यांच्या घरातून नोकराने केले पंधरा लाखांचे सोन्याचे बिस्किटे चोरी

काँग्रेस प्रवक्ता तथा नगरसेविका डॉ. हेमलता निनाद पाटील यांच्या टिळकवाडी येथील बंगल्यातून १५ लाख रुपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे चोरी झाल्याची घटना बुधवारी १३ फेब्रुवारी रात्री उघडकीस आली होती. पाटील यांच्या घरातील नोकरानेच चोरी केल्याचे लक्षात आल्यानंतर, पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन संशयिताला फरार नोकरास  परभणी येथे अटक केली आहे.

टिळकवाडी येथे राहणाऱ्या कॉँग्रेस प्रवक्ता डॉ. हेमलता निनाद पाटील यांच्या बंगल्यातील कपाटात ठेवलेले सोन्याचे पाच बिस्कीटे व दहा हजाराची रोकड घेऊन नोकर तब्बल महिनाभरापूर्वी गायब झाला; मात्र त्यांचे पती फिर्यादी निनाद पाटील यांच्या हा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, संशयित नोकराला परभणी पोलिसांनी सेलू गावातून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पाटील यांच्या बंगल्यात अनेक वर्षांपासून बंडू म्हसे हे नोकरी करत होते. तसेच, त्यांचा मुलगा आकाश म्हसे हादेखील कामासाठी येत असे. कपाटात ठेवलेली बिस्कीटे व १० हजारांची रोकड घेऊन तो १३ जानेवारी रोजी काढून  फरार झाला. त्या दिवसापासून आकाश कामावर दिसला नाही.  तो त्याच्या मूळ गावी  परभणी येथील सेलू  गेल्याचे सांगण्यात आले होते.

सरकारवाडा  पोलिसांनी याबाबत परभणी पोलिसांकडे तपासणी  केली असता त्यांनी सेलू गावातून चार  दिवसांपुर्वी आकाश नावाच्या एका संशयिताला सोन्याची बिस्कीटे विक्री करताना पकडले असल्याचे सांगितले, त्याने चोरीचे बिस्कीटे नाशिकमधून आणल्याचे येथील पोलिसांनी सांगितले. तसा गुन्हा नाशिकला दाखल झाला आहे. दरम्यान, परभणी पोलिसांकडून संशयित आकाशला सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार  आहे.त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचेही म्हटले आहे.

(बातमीतील फोटो हा प्रातिनिधिक आहे )

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.